शहरं
Join us  
Trending Stories
1
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
2
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
3
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय राठोड यांच्या प्रचाराला जाणार का? चित्रा वाघ यांनी एका वाक्यात दिले उत्तर
5
“महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाला धक्का, स्वाभिमान परत मिळवण्याची ही निवडणूक”: कन्हैय्या कुमार
6
ऑल इंडिया एकता फोरमचा 'मविआ'ला पाठिंबा; धर्मगुरु मौलाना सज्जाद नोमानी यांची घोषणा
7
"पंतप्रधान मोदी 'डंके की चोट पर' वक्फचा कायदा बदलणार"; राहुल गांधींना आव्हान देत अमित शाह यांची घोषणा
8
"राहुल गांधी, कान उघडे ठेवून ऐका, तुमची चौथी पीढी आली तरी..."; मुस्लीम आरक्षणावरून शाह यांचा थेट निशाणा
9
'माझे सरकार पाडले नसते, तर शेतकऱ्यांना कधीच कर्जमाफी दिली असती'- उद्धव ठाकरे
10
"पाच प्रश्नही सांगता येत नाही असा चेहरा कुणाला हवाय?"; सरवणकरांच्या लेकीचा अमित ठाकरेंवर हल्लाबोल
11
IPL मेगा लिलावाआधी Arjun Tendulkar चा 'पंजा'; यावेळी तरी लागेल का विक्रमी बोली?
12
“सत्तेसाठी भाजपा दाऊदला निवडणुकीत उभे करेल, त्याला सत्ता जिहाद म्हणायचे का?”: नाना पटोले
13
'सुशासनाची पहिली अट म्हणजे कायद्याचे राज्य...', सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर यूपी सरकारची पहिली प्रतिक्रिया
14
"दीपक केसरकर अदानींसाठी जागा शोधत होते"; सावंतवाडीत उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
15
“फडणवीसांनी मोठे काम काय केले? पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, फोडायला नाही”: शरद पवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'होय मी रस्त्यानेच आलो, रस्त्यानेच जातोय, 'कोकण दरोडेखोरांच्या हातात द्यायचं का?' उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना डिवचले
17
ठाकरेंच्या उमेदवाराकडून गुंडगिरी अन् महिलेचा विनयभंग; रवींद्र वायकरांचा गंभीर आरोप
18
जिंकलंस मित्रा! घरची परिस्थिती अत्यंत बेताची; भाजी विकून घेतलं शिक्षण, जिद्दीने झाला IAS
19
उद्धव ठाकरे वैभव नाईकांच्या घरातून बाहेर पडणार, इतक्यात गर्दीतून विचारले,"दौऱ्याची सुरुवात कशी झाली"
20
स्टेडियम परिसरात 'लॉकडाउन' सीन; त्यातही किंग कोहलीचा प्रॅक्टिस सेशनमधील फोटो लीक

भाजपा खासदारानं फ्लॅटवर बोलावून केला बलात्कार, "त्या" महिलेचा गंभीर आरोप

By admin | Published: May 01, 2017 6:25 PM

भाजपा खासदार के. सी. पटेल यांनी दिल्ली पोलिसांत एका महिलेनं त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याची तक्रार केली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 1 - भाजपा खासदार के. सी. पटेल यांनी दिल्ली पोलिसांत एका महिलेनं त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याची तक्रार दिली आहे. त्या महिलेनं माझ्याकडून 5 कोटींची मागणी केल्याचीही खळबळजनक माहिती या खासदारानं दिली होती. मात्र आता तक्रार करण्यात आलेल्या महिलेनंच भाजपा खासदार के. सी. पटेल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महिलेनं मीडियासमोर येत खासदार के. सी. पटेल यांच्या आरोपांचं खंडन केलं आहे. तसेच मला धमकावून माझ्यावर बलात्कार करण्यात आल्याचाही आरोप त्या महिलेनं के. सी. पटेल यांच्यावर केला आहे, असं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. पेशानं वकील असलेल्या महिलेनं सांगितलं की, खासदार के. सी. पटेल यांचा एक खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू होता. त्याच दरम्यान माझी के. सी. पटेल यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्यांनी खटल्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मला स्वतःच्या नर्मदा अपार्टमेंट, 604 नंबरच्या फ्लॅटवर बोलावलं. त्यावेळी त्यांनी माझ्यावर बलात्कारही केला आणि तोंड उघडल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याचा गौप्यस्फोट या महिलेनं केला आहे. महिला म्हणाली, के. सी. पटेल डिनरच्या निमित्तानं गाझियाबादमधील माझ्या घरीसुद्धा आले होते. त्यावेळीही त्यांनी माझ्यासोबत जोरजबरदस्तीनं बलात्कार केला. 28 मार्चला महिलेनं स्वतःच्या बचावाखातर खासदाराचा एक सेक्स व्हिडीओ बनवला. त्यानंतर त्या महिलेनं तू माझं भरपूर शोषण केलं आहेस. आता मी तुझी पोलिसांत तक्रार करणार असल्याची धमकीही खासदाराला दिली होती. खासदार के. सी. पटेल यांच्याविरोधात 15 एप्रिलला मी पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी खासदाराविरोधात गुन्हा दाखल केला नाही. तसेच खटला मागे घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आल्याचंही महिलेनं सांगितलं आहे. पोलीस मीच गुन्हेगार असल्यासारखे माझी चौकशी करत असल्याचंही ती महिला म्हणाली. खासदाराच्या आरोपांचं खंडन करत तिने सांगितलं की, माझी कोणतीही गँग नाही आणि मी पैशासाठी के. सी. पटेल यांना फोन केला नव्हता. मी भाजपाची कार्यकर्ती नसतानाही के. सी. पटेल मला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाहा यांची भेट घडवून देणार असल्याचे म्हणाले होते. विशेष म्हणजे महिलेनं 6 ते 7 महिन्यांपूर्वी एका राज्यसभा खासदारानंही एडिश्नल अ‍ॅडव्होकेट बनवण्याच्या नावाखाली शोषण केल्याचा आरोप केला आहे. मात्र काही लोकांच्या मध्यस्थीनंतर मी तक्रार परत घेतली आहे. त्या महिलेनं मेरठ युनिव्हर्सिटीतून लॉची डिग्री मिळवली आहे.