संत कबीरनगर (उत्तर प्रदेश) : सत्तारूढ भाजपाच्या दोन लोकप्रतिनिधींनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एकमेकांवर तुटून पडत मारहाण केली.बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याचे पालकमंत्री आशुतोष टंडन यांच्या उपस्थितीत घडलेल्या या द्वंद्वयुद्धाने बैठकीतील सर्वच अवाक् झाले. भाजपाचे खासदार शरद त्रिपाठी आणि मेहदावलचे भाजपा आमदार राकेश बघेल यांच्यात भर बैठकीतील द्वंद्वयुद्धाचा व्हिडिओ टीव्ही चॅनल्सवरही झळकल्याने भाजपातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला.रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्यावरून खासदार त्रिपाठी आणि आमदार बघेल यांच्यात टोकाची शाब्दिक खडाजंगी झाली. दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली. वाद एवढ्यावर थांबला नाही. खासदार त्रिपाठी यांनी जोड्याने मारहाण केली, तर आमदार बघेल यांनी त्रिपाठी यांनाही थापडा लगावल्या. कोनशिलेवर नाव नसल्याने भडकलेल्या खासदार त्रिपाठींनी बघेल यांच्याशी वाद घातला. उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी आणि पालकमंत्री टंडन यांनी दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला; तोवर दोघांत चांगलीच जुंपली होती. दोघेही माघार घेण्यास तयार नसल्याचे पाहून पालकमंत्री टंडन बैठकीतून निघून गेले.भाजपाच्या या दोन लोकप्रतिनिधींच्या आपसातील हाणामारीबाबत भाजपा जिल्हाध्यक्ष सेठ भान यांना विचारले असताते म्हणाले की, पालकमंत्री टंडनयांनी घडलेला प्रकार कळविला आहे. प्रदेश भाजपाध्यक्षांनी याप्रकरणी माझ्याकडे विचारणा केली.दरम्यान, भाजपाच्या एकानेत्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, हे प्रकरण वरिष्ठ नेत्यांशी संबंधित असल्याने प्रदेश भाजपाध्यक्ष महेंद्र नाथ पांडेय हेच काय तो निर्णय घेतील.शिस्तभंगाची कारवाई करणार..या प्रकारची गंभीर दखलघेतली असून दोघांना लखनौला बोलावले आहे. घडलेला प्रकारअत्यंत अशोभनीय आहे.पक्षाच्या शिस्तीनुसारशिस्तभंगाची कारवाई केलीजाईल, असे प्रदेश भाजपाअध्यक्ष महेंद्र नाथ पांडेय यांनी सांगितले.
भर बैठकीत भाजप खासदार, आमदाराची हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 4:30 AM