शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

Video : '...तर ते तुमच्या घरात घुसतील, बहीण-मुलीवर बलात्कार करतील'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 11:59 AM

भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान

नवी दिल्ली -  दिल्लीतील शाहीनबाग येथे सीएएविरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावर भाजपाच्या आणखी एका नेत्याने वादग्रस्त विधान केलं आहे. 'शाहीनबाग हे काश्मीर झालं आहे. भाजपा सत्तेत आली नाही तर ते तुमच्या घरात घुसतील, तुमच्या मुलीला-बहिणीला उचलून नेतील, त्यांच्यावर बलात्कार करतील आणि मारून टाकतील' असं वादग्रस्त विधान भाजपा खासदार परवेश वर्मा यांनी केलं आहे. तसेच दिल्लीत भाजपा सत्तेत आली तर शाहीनबाग एका तासात रिकामा करू असं देखील वर्मा यांनी म्हटलं आहे. 

भाजपा खासदार परवेश वर्मा यांनी 'दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया आम्ही शाहीनबागसोबत आहोत असं म्हणतात. मात्र शाहीनबाग हे काश्मीर झाले आहे. काश्मीरमध्ये ज्याप्रमाणे काश्मीर पंडितांच्या बहिणीवर, मुलीवर अत्याचार झाले. त्याचप्रमाणे दिल्लीत परिस्थिती उद्भवेल. भाजपा सत्तेत आली नाही तर ते तुमच्या घरात घुसतील, तुमच्या मुलीला-बहिणीला उचलून नेतील, त्यांच्यावर बलात्कार करतील आणि मारतील. त्यामुळे तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. उद्या मोदी किंवा अमित शहा तुम्हाला वाचवायला येणार नाहीत' असं म्हटलं आहे. 

'दिल्लीत जर भाजपा सत्तेत आली तर शाहीनबाग एका तासात रिकामा करू' असं देखील वर्मा यांनी म्हटलं आहे. कोण पाठिंबा देत आहे व कोण विरोध करीत आहे, हे सर्वांना माहिती आहे. जर दिल्लीत भाजपा सत्तेत आली तर आम्ही एका तासात शाहीन बाग रिकामा करू असं म्हणत शाहीनबागमध्ये सुरू असलेल्या आंदोलनावर टीका केली आहे. भाजपा नेते राहुल सिन्हा यांनी शाहीनबाग येथील आंदोलनातील लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी असल्याचं म्हटलं आहे. 'दिल्लीतील शाहीनबाग येथे आंदोलनासाठी बसलेले बहुतांश लोक हे बांगलादेश आणि पाकिस्तानमधून आले आहेत' असं वादग्रस्त विधान सिन्हा यांनी केलं आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या मुद्द्यांवरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. 

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शाहीनबाग आंदोलनावर टीका केली आहे. शाहीनबाग येथे सुरू असलेले आंदोलन नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात नसून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आहे. या कायद्यावरून जनतेची दिशाभूल केली जात आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रचलेला हा डाव आहे. त्यामुळे शाहीनबाग हा देशाला तोडणारा मंच आहे अशा शब्दात केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शाहीनबाग आंदोलनावर टीका केली आहे. सोमवारी (27 जानेवारी) एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. 

प्रसाद यांनी तुकडे तुकडे गँगच्या मदतीने पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात शाहीनबागमध्ये लहान मुलांच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला आहे. तसेच शाहीनबागमधील लोकांना त्रास होत असताना केजरीवाल शांत कसे बसतात असा सवालही त्यांनी केला आहे. 'राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल हे दोघेही सीएएबाबत संभ्रम निर्माण करत आहे. या कायद्यामुळे कोणाचेही नागरिकत्व धोक्यात येणार नाही हे आम्ही वारंवार सांगितले आहे. या देशात प्रत्येक व्यक्ती ही सन्मानाने जगत होती आणि भविष्यातही प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार कायम राहणार आहे. कायद्यातील ज्या कलमावर आक्षेप आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी आम्ही कधीही तयार आहोत. मात्र कोणीही चर्चा करण्यासाठी पुढे येत नाही' असं रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

सत्तेत येऊन राष्ट्रवादी-शिवसेनेनं 'जे' केलं, ते काँग्रेसनेही करावं; मिलिंद देवरांचे सोनिया गांधींना पत्र

'दंगल घडवणाऱ्या रझा अकादमीसोबत मुख्यमंत्र्यांची भेट; मग ऊत येणे स्वाभाविकच नाही का?'

Video: देश के गद्दारो को...गोली मारो ***; केंद्रीय मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानावर विरोधक संतप्त  

...तर केंद्राकडून राज्य सरकार बरखास्त होईल?; भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांचा इशारा

China Coronavirus : चीनमध्ये कोरोना व्हायरसचं थैमान; 106 जणांनी गमावला जीव

कोरोनाचे विषाणू १३ देशांमध्ये; राज्यात चार संशयित रुग्ण; देशात तिघे

 

टॅग्स :BJPभाजपाdelhiदिल्लीNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा