आठ पोलिसांची हत्या घडवणारा गँगस्टर विकास दुबे शुक्रवारी (10 जुलै) एन्काऊंटरमध्ये ठार झाला. मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये विकास दुबेला गुरुवारी अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला कानपूरला नेलं जात असताना पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. विकास दुबेने पोलिसांकडील बंदूक घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीत दुबे ठार झाला. त्याच्या एन्काऊंटरनंतर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. याच दरम्यान भाजपाचे एक नेते वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहे.
मध्य प्रदेशच्या रिवा येथील भाजपाचे खासदार जनार्दन मिश्रा यांच्या एका वक्तव्याने नवा वाद निर्माण केला आहे. राजकारणीच गुन्हेगारांना आश्रय देत आले आहेत. पंतप्रधानांपासून ते सरपंचापर्यंत सर्वांनीच या व्यवस्थेला जन्म दिला आहे असं जनार्दन मिश्रा यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वादग्रस्त विधानामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. विकास दुबे याच्या एन्काऊंटरवर प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. तसेच गोळी मारणाऱ्यांचे म्हणजेच गुन्हेगारांचे आपण समर्थक आहोत असं देखील मिश्रा यांनी सांगितलं.
"राजकीय आश्रय मिळाल्यामुळेच गुन्हेगार मोठे झाले. यामुळे समाजात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली. देशात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढत आहे. पंतप्रधानांपासून ते सरपंचांपर्यंत सर्वच जण गुन्हेगारांना आश्रय देत आलेत. पंतप्रधान असो की मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री प्रत्येक गुन्हेगार राजकारण्यांच्या संपर्कात आहे" असं जनार्दन मिश्रा यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. याआधीही मिश्रा यांनी शेतकऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या कर्जवसूली संदर्भात वादग्रस्त विधान केलं होतं. शेतकऱ्यांकडे कर्जवसूलीसाठी कोणी आलं तर त्यांचे हात तोडू आणि गळा दाबून मारून टाकू असं जनार्दन मिश्रा यांनी म्हटलं होतं.
उत्तर प्रदेशात आठ पोलिसांची हत्या घडवणारा गँगस्टर विकास दुबे शुक्रवारी (10 जुलै) सकाळी एन्काऊंटरमध्ये ठार झाला. एन्काऊंटरमध्ये गंभीर जखमी झालेल्या दुबेला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. विकास दुबेला मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये अटक करण्यात आली. त्याला कानपूरला नेलं जात असताना पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. यानंतर विकास दुबेनं पोलिसांकडील बंदूक घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीत विकास दुबे ठार झाला.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : बापरे! कोरोनाच्या संकटात देशातील 62 टक्के मुलांचं थांबलं शिक्षण, धक्कादायक अहवाल
CoronaVirus News : ट्रम्प यांचा 'हा' लूक पाहिलात का?, पहिल्यांदाच लावला मास्क अन्...
CoronaVirus News : "फक्त फुफ्फुसांवर नाही तर शरीरातील 'या' अवयवांवर हल्ला करतो कोरोना"
या देशाला आज मनमोहन सिंगांची गरज आहे, कारण...; शरद पवारांचं स्पष्ट मत
CoronaVirus News : कोरोनाचा धसका! पीपीई किट परिधान करून पानवाला चालवतोय टपरी