शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
2
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
3
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
4
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
5
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
8
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
9
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
10
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
11
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
12
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
13
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
14
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
15
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
16
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
17
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
18
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
19
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
20
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान

"पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे बांगलादेशातील हिंदू वाचले", भाजप खासदाराचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 2:25 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे बांगलादेशातील हिंदूंचे प्राण वाचले, असे विधान खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे.

उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी बांगलादेशातील अल्पसंख्याकांवरील हिंसाचारावर मोठा दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे बांगलादेशातील हिंदूंचे प्राण वाचले, असे विधान खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे.

बांगलादेशात जे काही घडले, ती अत्यंत चिंतेची बाब आहे. तिथल्या घटना खूप वेदनादायी आहेत. नरेंद्र मोदींनी बांगलादेशातील हिंदूंना वाचवले आहे. मात्र, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अल्पसंख्यांकांबाबत रात्रंदिवस आटा पिटा करणारे गप्प बसले आहेत, असे खासदार साक्षी महाराज यांनी म्हटले आहे.

खासदार साक्षी महाराज यांनी अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांच्यासह संपूर्ण इंडिया आघाडीतील नेते अल्पसंख्यांकांबद्दल बोलतात. मात्र, आजपर्यंत त्यांनी बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समुदायाच्या बाजूने कोणतेही खुले विधान केलेले नाही.

भारतातील जनतेने हे समजून घेतले पाहिजे की त्यांचे समर्थक आणि रक्षक कोण आहेत, असे खासदार साक्षी महाराज म्हणाले. तसेच, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणतात की हिंदू कमी झाले तर त्यांना मारहाण केली जाईल. हिंदू कमी झाले तर देशाची फाळणी होईल, त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे, असे खासदार साक्षी महाराज सांगितले.

याचबरोबर, देशातील हिंदूंनी संघटित राहण्याची गरज आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशातील हिंदूंना वाचवले आहे, असे खासदार साक्षी महाराज सांगितले. तसेच, पश्चिम बंगालच्या मुद्द्यावर खासदार साक्षी महाराज म्हणाले की, जर आपण तिथली लढाई लढत असू तर जनतेने लक्ष देण्याची गरज आहे.

बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूवर हल्लेदरम्यान, काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्यावरुन बांगलादेशात असंतोष पसरला होता. शेख हसीना यांच्या सरकारविरोधात जनतेनं उठाव केला होता. यानंतर परिस्थिती इतकी चिघळली की, शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडावा लागला. या घटनेनंतर आता बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. मात्र, येथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. जमावाकडून देशात अनेक हिंदू समुदायावर हल्ले करण्यात आले. तसेच, गेल्या काही दिवसांत बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूवर हल्ले होत असल्याचे दिसून आले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBangladeshबांगलादेश