शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
2
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
3
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
4
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
5
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
6
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
7
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
8
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
9
'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर
10
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
11
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
12
गुरु प्रदोष: ८ राशींना अचानक धनलाभ योग, शुभ घडेल; इच्छापूर्ती, दत्तगुरु-महादेवांची कृपा!
13
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
14
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
15
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
16
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
17
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
18
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
19
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
20
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा

नुसरत जहाँ यांच्यावर प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याचा भाजपा खासदाराचा आरोप, कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 1:07 PM

Nusrat Jahan : भाजपा खासदार संघमित्रा मौर्य (Sanghamitra Maurya) यांनी संसदेत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याचा आरोप नुसरत जहाँ यांच्यावर केला आहे.

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदार नुसरत जहाँ (Nusrat Jahan) यांच्या अडचणीत आणखी वाढ होऊ शकते. कारण, भाजपा खासदार संघमित्रा मौर्य (Sanghamitra Maurya) यांनी संसदेत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याचा आरोप नुसरत जहाँ यांच्यावर केला आहे. तसेच, नुसरत जहाँ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपा खासदार संघमित्रा मौर्य यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून केली आहे. (bjp mp sanghamitra maurya writes lok sabha speaker seeks action against nusrat jahan over false information)

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी नुसरत जहाँ यांनी एक निवेदन जारी केले होते. यात भारतामध्ये दोन धर्मांमधल्या लग्नांना विशेष विवाह कायद्यानुसार मान्यता मिळणे गरजेचे असते, पण आपण असे न केल्याने निखिल यांच्यासोबतचे आपले लग्न कधीच वैध नव्हते. कायद्यानुसार ते लग्न नसून लिव्ह इन रिलेशनशिप आहे, असे नुसरत जहाँ यांनी म्हटले होते. यानंतर नुसरत जहाँ यांच्याविरोधात ही तक्रार करण्यात आली आहे.

लोकसभेच्या सभापतींना लिहिलेल्या पत्रात भाजपा खासदार संघमित्रा मौर्य यांनी म्हटले आहे की, "नुसरत जहाँ यांनी माध्यमांना नुकत्याच दिलेल्या माहितीवरून त्यांनी लोकसभा सचिवालयाला जाणीवपूर्वक चुकीची माहिती दिली असल्याचे स्पष्ट झाले आहे. खोटी व दिशाभूल करणारी माहिती देऊन आपल्या मतदारांना हेतूपूर्वक फसवण्यासारखे आणि संसद व संसदेच्या सन्माननीय खासदारांची प्रतिमा खराब करण्यासारखे आहे." याचबरोबर, पत्रात म्हटले आहे की, 'नुसरत जहाँ यांचे हे निवेदन प्रभावीपणे त्यांची लोकसभा सदस्यता गैर-कानूनी रूपात सादर करतेट. विशेष म्हणजे, आतापर्यंत कोणीही नुसरत जहाँ यांच्याविरोधात तक्रार दाखल केली नव्हती.

नुसरत जहाँ गर्भवती असल्याच्या बातम्या आल्यापासून चर्चानुसरत जहाँ गर्भवती असल्याच्या बातम्या आल्यापासून याबद्दल चर्चा होऊ लागली. नुसरत जहाँ  आणि व्यापारी निखिल जैन गेल्या सहा महिन्यांपासून विभक्त राहत असल्याने विविध शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या. तसेच, नुसरत जहाँ आणि भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवलेले अभिनेते यश दासगुप्ता यांच्यात जवळीक असल्याची चर्चा व्हायला लागली. त्यानंतर आपले निखिलसोबत लग्न झाले नसल्याचा दावा नुसरत जहाँ यांनी केला होता. हे लग्न नव्हते तर लिव्ह - इन रिलेशनशिप होते, त्यामुळे घटस्फोटाचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे नुसरत जहाँ यांनी म्हटले होते. तसेच, आपण पूर्वीच विभक्त झाल्याचेही नुसरत जहाँ यांनी म्हटले होते. दरम्यान, निखिल जैन यांच्यासोबत टर्कीमध्ये जून 2019 मध्ये नुसरत जहाँ यांनी लग्न केले. त्याच वर्षी लोकसभा निवडणूक जिंकत त्यांनी राजकीय कारकीर्दीलाही सुरुवात केली होती.

टॅग्स :nusrat jahanनुसरत जहाँBJPभाजपाParliamentसंसदwest bengalपश्चिम बंगाल