तेलंगणाचेभाजपा खासदार सोयाम बापू राव हे एक व्हिडीओ समोर आल्यानंतर वादात सापडले आहेत. यामध्ये ते सरकारी निधीचा दुरुपयोग करताना दिसत आहे. सोयम बापू राव यांनी देखील मान्य केलं आहे की, त्यांनी MP एलएडीएस निधी वैयक्तिक कारणांसाठी वापरला आहे. सोयम बापू राव यांनी भाजपाच्या प्रतिनिधींसोबत एका कार्यक्रमात उघडपणे कबूल केलं की त्यांनी एमपी लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम (LADS) निधी त्यांच्या मतदारसंघाच्या विकासासाठी न वापरता त्यांच्या वैयक्तिक कारणांसाठी वापरला.
1993 मध्ये सुरू करण्यात आलेली MPLADS योजना, खासदारांना त्यांच्या मतदारसंघातील विशिष्ट गरजांवर आधारित स्थानिक विकास प्रकल्पांसाठी निधी वाटप करण्याची परवानगी देते. व्हायरल व्हिडिओमध्ये, राव यांनी मिळालेल्या पैशांचा एक भाग महापालिका पोलीस प्रशिक्षण समिती (एमपीटीसी) आणि परिसरातील नगरसेवकांना वाटला असं देखील म्हटलं आहे.
घर बांधण्यासाठी वापरले पैसे
खासदार म्हणाले, "दुसऱ्यांदा अडीच कोटी रुपये आले. आम्ही एमपीटीसी आणि या भागातील नगरसेवकांना काही रक्कम दिली. मतदारसंघात माझे घर नसल्याने त्यातील काही रक्कम मी घर बांधण्यासाठी वापरली. दुसरा कोणताही नेता ते मान्य करणार नाही, पण मी ते स्वीकारत आहे. आपल्या मुलाच्या लग्नासाठी खासदार निधीतून पैसे खर्च केल्याचेही त्यांनी मान्य केलं आहे.
सोयाम बापू राव य़ांनी यापूर्वी अनेक खासदारांनी त्यांच्या कामांसाठी संपूर्ण निधी वापरला. आज आमच्या पक्षाचे काही नेते माझ्यावर टीका करत आहेत, पण माझ्या आधी या जनतेचा पैसा इतरांनी कसा वापरला, हे त्यांच्या लक्षात येत नाही असं म्हटलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.