शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

भाजप खासदाराने विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडला? काँग्रेस, तृणमूल आणि MIMचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 8:27 PM

10 डिसेंबर 2022 रोजी प्रवाशाने इंडिगो फ्लाइटचा आपात्कालीन दरवाजा उघडला. हा प्रवासी भाजप खासदार तेजस्वी सूर्या असल्याचा आरोप आहे.

Indigo Flight : गेल्या काही दिवसांपासून विमानात घडलेल्या घटना चर्चेत आल्या आहेत. अशाच प्रकारची एक घटना गेल्या वर्षी 10 डिसेंबर रोजी इंडिगोच्या फ्लाइटमध्ये घडली होती. एका प्रवाशाने चक्क विमानाचा आपत्कालीन दरवाजाच उघडला. यामुळे प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. हे विमान चेन्नईहून तिरुचिरापल्लीला जात होतं. याप्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) चौकशीचे आदेश दिले आहेत. 

या प्रकरणात तेजस्वी सूर्याचे नावप्रवाशाच्या या कृत्यामुळे विमानाला दोन तास उशीर झाला. पण, इंडिगो 6E-7339 फ्लाइटनं तपासणीनंतर लगेचच उड्डाण केलं. त्यावेळेस विमान कंपनीनं प्रवाशाची माफी स्वीकारली, पण कोणतीही कारवाई केली नाही. डीजीसीएने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले, पण त्या व्यक्तीची ओळख गुप्त ठेवली. दरम्यान, डिसेंबर महिन्यात घडलेल्या या घटनेत भाजयुमो अध्यक्ष आणि खासदार तेजस्वी सूर्याचे नाव आले आहे. या विमानाचा दरवाजा तेजस्वी सूर्याने उघडल्याचा आरोप काँग्रेस, AIMIM आणि तृणमूल काँग्रेसने केला आहे.

TMC, MIM, काँग्रेसचा आरोप

या घटनेवर काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी कडक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट केले की, भाजपचे व्हीआयपी. एअरलाइनकडे तक्रार करायची हिम्मत कशी झाली. सत्ताधाऱ्यांची ही वृत्ती झाली आहे का? प्रवाशांच्या सुरक्षेसोबत तडजोड करतात का? तुम्ही भाजपच्या व्हीआयपींना प्रश्न विचारू शकत नाही.'

या घटनेवर प्रतिक्रिया देताना टीएमसीने म्हटले की, 'भाजप खासदार तेजस्वी सूर्याच्या बेजबाबदारपणामुळे प्रवाशांचा जीव गेला असता. प्रत्यक्षदर्शी सांगतात की, त्यानेच 10 डिसेंबर 2022 रोजी इंडिगो फ्लाइटचा आपत्कालीन एक्झिट दरवाजा उघडला होता. डीजीसीए कोणतीही कारवाई करत नाही. त्यांच्या पक्षाने त्यांना मोफत पास दिला आहे का?'

एआयएमआयएमचे खासदार ओवेसी यांनी या घटनेवर प्रसारमाध्यमांच्या वृत्ताला टोला लगावत तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी ट्विट केले की, 'तुमचे नाव "सुसंस्कृत" असेल तर ते कॅज्युअल आहे, जर नाव अब्दुल असेल तर.... कृपया सीटबेल्ट बांधा.'

सुरक्षेशी तडजोड नाही – DGCAया घटनेची माहिती देताना डीजीसीएचे महासंचालक म्हणाले की, तामिळनाडूचे भाजप प्रमुख अन्नामलाई, डीएमकेचे प्रवक्ते बीटी अर्साकुमार आणि भाजप खासदार तेजस्वी सूर्या विमानात असल्याचे समोर आले आहे. द्रमुकच्या प्रवक्त्याने पुष्टी केली आहे की, अन्नामलाई आणि सूर्या फ्लाइटमध्ये उपस्थित होते. या घटनेनंतर त्यांना खाली उतरण्यास सांगण्यात आले आणि 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसमध्ये थांबवले. यादरम्यान, आम्ही सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली नाही.  

टॅग्स :IndigoइंडिगोairplaneविमानBJPभाजपाtmcठाणे महापालिकाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन