'भाजप खासदारांनी मला ढकलले, माझ्या गुडघ्याला दुखापत झाली'; मल्लिकार्जुन खरगेंनी केले गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 14:08 IST2024-12-19T14:06:39+5:302024-12-19T14:08:02+5:30
भारतीय जनता पक्षाच्या खासदारांमध्ये झालेल्या गोंधळात माझ्या गुडघ्याला दुखापत झाल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्रही लिहिले आहे.

'भाजप खासदारांनी मला ढकलले, माझ्या गुडघ्याला दुखापत झाली'; मल्लिकार्जुन खरगेंनी केले गंभीर आरोप
भारतीय जनता पक्षाच्या खासदारांमध्ये झालेल्या गोंधळात माझ्या गुडघ्याला दुखापत झाल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्रही लिहिले आहे. काही वेळापूर्वीच भाजपने काँग्रेस खासदार राहुल गांधींवर खासदार प्रताप सारंगी यांना जमिनीवर ढकलल्याचा आरोप केला होता. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये सारंगी यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, आता काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खरगे यांनीही आरोप केला आहे.
संसदेत राडा...! राहुल गांधींवर एफआयआर दाखल करण्याची भाजपाची तयारी; Video शोधायला सुरुवात
मकर द्वार येथे भाजप खासदारांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप खरगे यांनी केला. खरगे यांनी पत्रात लिहिले की, 'आज सकाळी इंडिया आघाडीचे खासदार प्रेरणा स्थळ येथील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यापासून मकर द्वारपर्यंत पदयात्रा काढत होते. १७ डिसेंबर २०२४ रोजी केंद्रीय गृहमंत्र्यांनी राज्यसभेत दिलेल्या भाषणादरम्यान डॉ. आंबेडकरांच्या अपमानाच्या विरोधात हे निदर्शने करण्यात आले.
खरगे यांनी पुढे लिहिले की, 'जेव्हा मी इंडिया आघाडीच्या खासदारांसह मकर द्वारला पोहोचलो, तेव्हा मला भाजपच्या खासदारांनी धक्काबुक्की केली. यामुळे माझा तोल गेला आणि मकर द्वारसमोरील जमिनीवर बसावे लागले. यामुळे माझ्या गुडघ्याला दुखापत झाली आहे, त्यासाठी आधीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या घटनेनंतर काँग्रेस खासदाराने खुर्ची आणली आणि मला त्यावर बसवण्यात आले.
'मोठ्या कष्टाने आणि माझ्या मित्रांच्या मदतीने मी सकाळी ११ वाजता सभागृहात पोहोचलो. मी या घटनेची चौकशी करण्याचे आवाहन करतो, हा केवळ माझ्यावरच नव्हे तर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्षांवरही हल्ला आहे.
भाजप खासदार प्रताप सारंगी संसदेच्या संकुलात निदर्शनादरम्यान जखमी झाले. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या धक्काबुक्कीमुळे ही दुखापत झाल्याचे त्यांनी म्हटले होते. एक व्हिडिओही समोर आला होता,यात सारंगी यांना जखमी अवस्थेत नेले जात होते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, 'राहुल गांधींनी एका खासदाराला धक्का दिला होता, तेव्हा ते माझ्यावर पडले आणि त्यानंतर मी पडलो. मी पायऱ्यांजवळ उभा असताना राहुल गांधींनी एका खासदाराला धक्का दिला.
The Leader of the Opposition in the Rajya Sabha and Congress President Mallikarjun Kharge wrote a letter to the Lok Sabha Speaker Om Birla stating that he was physically pushed by the BJP MPs at the Makar Dwar and sustained an injury on his knees. He has urged the speaker to… pic.twitter.com/GMDgVr95I2
— ANI (@ANI) December 19, 2024