१५ पोटनिवडणुकांत निम्म्याहून अधिक जागा जिंकणे भाजपला आवश्यकच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 06:19 AM2019-11-14T06:19:18+5:302019-11-14T06:20:03+5:30
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला असली तरी ५ डिसेंबर रोजी पोटनिवडणुकीत १५ पैकी निम्म्याहून अधिक जागा भाजपला जिंकाव्याच लागणार आहेत.
बंगळुरू : कर्नाटकातील अपात्र आमदारांना पुन्हा विधानसभा निवडणूक लढवण्याची मुभा सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला असली तरी ५ डिसेंबर रोजी पोटनिवडणुकीत १५ पैकी निम्म्याहून अधिक जागा भाजपला जिंकाव्याच लागणार आहेत. तसे न झाल्यास येडियुरप्पा सरकार अल्पमतात येईल.
काँग्रेस व जनता दल (धर्मनिरपेक्ष) च्या १७ बंडखोर आमदारांना विधानसभाध्यक्षांनी अपात्र ठरविले होते. तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. मात्र त्या सर्वांना पुन्हा निवडणूक लढवण्याची संमती दिली. आता १७ पैकी १५ जागांसाठी ५ डिसेंबर रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. दोन जागांसाठीची पोटनिवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही.
एकूण २२४ सदस्य असलेल्या विधानसभेतील १७ सदस्य अपात्र ठरल्यामुळे सभागृहातील आमदारांची संख्या २0७ वर आली. त्यामुळे बहुमताचा आकडा १0४ वर आला. भाजपकडे सध्या १0५ आमदार आहेत. त्यामुळे सरकारला आता धोका
ााही.
१५ जागांसाठी ५ डिसेंबर रोजी मतदान झाल्यानंतर त्यापैकी किमान ७ ते ८ जागा जिंकणे भाजपला आवश्यक आहे. तसे झाले तरच भाजपचे कर्नाटक विधानसभेत बहुमत कायम राहील. (वृत्तसंस्था)
।भाजपला जिंकण्याची खात्री
मात्र या १५ पैकी निम्म्या वा त्याहून अधिक जागा भाजपला न मिळता काँग्रेस, जनता दल वा अन्य कोणत्याही विरोधी पक्षाने जिंकल्यास भाजपचे सभागृहात बहुमत राहणार नाही. येडियुरप्पा सरकार अडचणीत येईल. अधिकाधिक जागा जिंकण्याच्या दृष्टीने भाजपने प्रयत्न चालविले आहेत. काँग्रेस व जनता दल (धर्मनिरपेक्ष) वेगळे झाले असल्याने आम्हाला किमान ८ ते १0 जागा सहज जिंकता येतील, असे भाजप नेते सांगत आहेत.