शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

West Bengal Election 2021: “असा हिंसाचार भारताच्या फाळणीवेळी घडल्याचे ऐकले होते”; जेपी नड्डा कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 6:31 PM

West Bengal Election 2021: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा दोन दिवसाच्या कोलकाता दौऱ्यावर असून, बंगालमध्ये होत असलेल्या हिंसाचाराबाबत दुःख व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देअसा हिंसाचार भारताच्या फाळणीवेळी घडल्याचे ऐकले होतेहिंसाचाराच्या घटना चिंताजनक आणि धक्कादायकजेपी नड्डा बंगाल दौऱ्यावर

कोलकाता: देशभरातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल २ मे रोजी लागले. सर्वांचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी भाजपला पराभवाचा मोठा धक्का दिला. मात्र, यानंतर आता बंगालमध्ये हिंसाचाराच्या मोठ्या घटना घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापटी झाल्या असून, यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा दोन दिवसाच्या कोलकाता दौऱ्यावर असून, बंगालमध्ये होत असलेल्या हिंसाचाराबाबत दुःख व्यक्त केले आहे. (bjp nadda says I had heard of such incidents during India partition)

पश्चिम बंगालची निवडणूक तृणमूल काँग्रेस आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची झाली होती. अटीतटीचा सामना होण्याचा अंदाज खोटा ठरवत तृणमूलने भाजपला रोखून तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. भाजपच्या पराभवानंतर राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा प्रथमच कोलकाता येथे पोहोचले. विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वैचारिक लढाई लढण्यासाठी वचनबद्ध आहोत, असे नड्डा यांनी यावेळी नमूद केले.

बंगालमधील हिंसाचाराचा निषेध; भाजप उद्या राज्यभर निदर्शने करणार

हिंसाचाराच्या घटना चिंताजनक आणि धक्कादायक

पश्चिम बंगालमधल्या निवडणुकीच्या निकालानंतर तिथे घडलेल्या हिंसाचाराच्या घटना चिंताजनक तसेच धक्कादायक आहेत. अशा घटना भारताच्या फाळणीच्या वेळी घडल्याचे ऐकले होते. स्वतंत्र भारतात निवडणूक निकालानंतर अशा प्रकारच्या घटना घडल्याचे कधी पाहिले नव्हते. तृणमूलकडून होणारे हे प्रकार असहिष्णू आहेत. आम्ही लोकशाही पद्धतीने याविरुद्ध लढणार आहोत. आता पुढे या हिंसाचारामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या परिवारांना भेटी देणार आहे, असे नड्डा यांनी सांगितले.

कोरोनाबाबत दूरदृष्टीचा अभाव, गाफीलपणा भोवला; रघुराम राजन केंद्रावर संतापले

महाराष्ट्रातही भाजपकडून निदर्शने

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर जबरदस्त हिंसाचार सुरू केला असून, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे खून करण्यात येत आहेत. या राजकीय हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते उद्या, बुधवारी राज्यभर ठिकठिकाणी निदर्शने करणार आहेत, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.

“वीकेंड लॉकडाऊन, नाइट कर्फ्यूचा काही उपयोग नाही; कडक लॉकडाऊन अनिवार्य”

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक निकालानंतर पुन्हा एकदा हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. गेल्या दोन दिवसात घडलेल्या हिंसाचाराबाबत भाजपाने चिंता व्यक्त केली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. बंगालमधील कायदा सुव्यवस्थेबद्दल पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केल्याची माहिती राज्यपाल जगदीप धनखर यांनी ट्वीट करून दिली. 

टॅग्स :Assembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Trinamool Congressतृणमूल काँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाJ P Naddaजगत प्रकाश नड्डाPoliticsराजकारण