शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
2
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
3
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
4
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
5
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
6
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
7
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
8
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
9
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
10
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
11
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
12
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
13
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
14
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
15
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
16
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
17
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
18
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
19
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट
20
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन

ईशान्येत भाजपाच! त्रिपुरात डाव्यांचा पराभव, दोन राज्यांत काँग्रेसला नाही एकही जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 6:14 AM

गेली २५ वर्षे सलग सत्तेत असलेल्या मार्क्सवाद्यांना त्रिपुरातून हुसकावून लावून, भाजपाने तिथे मुसंडी मारली आहे. तेथील ५९ पैकी ४४ जागांवर विजय मिळविला असून, २0१३ साली ४९ जागा मिळविणा-या मार्क्सवाद्यांना केवळ १६ जागांवर विजय मिळाला. ईशान्येच्या २ राज्यांतही भाजपाने चंचुप्रवेश केला आहे.

नवी दिल्ली : गेली २५ वर्षे सलग सत्तेत असलेल्या मार्क्सवाद्यांना त्रिपुरातून हुसकावून लावून, भाजपाने तिथे मुसंडी मारली आहे. तेथील ५९ पैकी ४४ जागांवर विजय मिळविला असून, २0१३ साली ४९ जागा मिळविणाºया मार्क्सवाद्यांना केवळ १६ जागांवर विजय मिळाला. ईशान्येच्या २ राज्यांतही भाजपाने चंचुप्रवेश केला आहे.नागालँडमध्ये भाजपाप्रणीत आघाडी व एपीएफ या दोघांना जवळपास सारख्याच जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, जनता दल (यु)चा एक आमदार व एका अपक्षाने भाजपाला समर्थन देण्याचे जाहीर केल्याने नागालॅँडमध्ये भाजपा आघाडीची सत्ता येण्याची शक्यता आहे. मेघालयामध्येही अनिश्चितच स्थिती आहे. तिथे काँग्रेसला २१, एनपीपीला १९ जागा मिळाल्या असून, भाजपाला २, यूडीपीला ८ आणि इतरांना ११ जागा मिळाल्या असून, त्यापैकी यूडीपी, तसेच इतर कोणाला पाठिंबा देतात, यावर तेथील सरकारचे बनणे अवलंबून आहे.काँग्रेस दोन्हीकडे नाहीया निवडणुकांचे वैशिष्ट्य म्हणजे, यंदा त्रिपुरा व नागालँड या २ राज्यांत काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. याउलट नागालँड व मेघालय या दोन्ही राज्यांत भाजपाने खातेही उघडले असून, तिथेही आम्ही ठरवू, तेच सरकार बनवू शकतील, असा पवित्रा घेतला आहे.सर्वाधिक जागा मिळालेल्याकाँग्रेसला मेघालयात कोणत्याही स्थितीत सरकार बनवू द्यायचे नाही, असा पणच भाजपाने केला आहे. एनपीपीला मदत करतानाच, इतर पक्षांचा पाठिंबा मिळवून देण्यासाठीही भाजपा सर्वतोपरी साह्य करेल, असे चित्र आहे.नेते शिलाँगकडे : मणिपूर व गोवा ही राज्ये हातात येण्याची शक्यता असताना काँग्रेस नेतृत्वाने हवी तितकी घाई न केल्याने गमावली होती. यंदा तसे होऊ नये, यासाठी मेघालयात सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता दिसताच, काँग्रेसने अहमद पटेल व कमलनाथ या दोघांना सकाळीच शिलाँगला पाठविले. तिथे अन्यांची मदत घेण्यासाठी त्यांनी बोलणी सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपानेही हिमांता बिस्वा सर्मा यांना शिलाँगला पाठविले आहे. सर्मा हे एके काळी काँग्रेसमध्येच होते आणि सध्या भाजपाच्या ‘नेडा’ (नॉर्थ ईस्ट डेमॉक्रेटिक अलायन्स-ईशान्य लोकशाही आघाडी)चे प्रमुख आहेत.नागालँडमध्ये एनपीपीचे टी. आर. झेलियांग की एनडीपीपीचे नैफियू रिओ मुख्यमंत्री होणार हेही त्यांना किती अपक्ष पाठिंबा देतात, यावर ठरेल.‘सरकार यांना त्रिपुरात स्थान नाही’त्रिपुरातील डाव्यांच्या पराभवानंतर माणिक सरकार यांनी केरळ, पश्चिम बंगाल वा बांगलादेशात जावे, असा उपरोधिक टोला भाजपाचे ईशान्येकडील नेते हिमांता बिस्वा सर्मा यांनी लगावला. माणिक सरकार सलग २0 वर्षे त्रिपुराचे मुख्यमंत्री होते.स्वबळावर १७ राज्येभाजपाने आतापर्यंत १६ राज्यांत स्वबळावर सत्ता मिळवली, तर काश्मीर, महाराष्ट्र, गोवा, मणिपूर, बिहार या राज्यांत मित्रपक्षांसोबत भाजपा सत्तेवर आहे. म्हणजेच तिथे रालोआचे सरकार आहे. आता त्रिपुरात सत्ता मिळाल्याने भाजपा १७ राज्यांत स्वबळावर असेल. नागालँड व मेघालयात सरकार स्थापन करण्यात भाजपा व मित्रपक्षांना यश आल्यास रालोआ सरकार असलेल्या राज्यांची संख्या वाढेल.त्रिपुरात बिप्लब देबत्रिपुरामध्ये बिप्लब देब हेच भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, असे दिसत आहे. ते संघाचे कार्यकर्ते असून, ते व्यवसायाने जिम इन्स्ट्रक्टर होते.मेघालयात एखादे संगमामेघालयात काँग्रेसचे मुकुल संगमा व एनपीपीचे कानरॅड संगमा यांच्यापैकी एक मुख्यमंत्री होईल, हे नक्की. अर्थात, अपक्ष व इतर कोणाला पाठिंबा देणार, यावर हे अवलंबून आहे.भाजपाचा दोन्ही राज्यांत दावामेघालयाबरोबरच नागालँडमध्ये २ अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळविण्यात आमची आघाडी यशस्वी होईल, असा दावा भाजपा नेते करीत आहेत. त्रिपुरामध्ये स्वबळावर सत्ता आणि मेघालय व नागालँडमध्ये आपल्या मदतीने सरकार या पद्धतीने ईशान्य भारतातील राज्यांवर कब्जा करण्याचा भाजपाचा स्पष्ट प्रयत्न आहे.नागालँडच्या पराभवाला सी. पी. जोशी जबाबदार काँग्रेसच्या पराभवाला प्रभारी सी. पी. जोशी जबाबदार असून, त्यांनी नागालँडच नव्हे, तर ईशान्येच्या सर्वच राज्यांतून काँग्रेस पक्ष संपविला, असा आरोप नागालँड काँग्रेसच्या अध्यक्षांनी पराभवानंतर केला. त्यांनी राहुल गांधी यांना इथे येऊ ही दिले नाही, असे ते म्हणाले.

टॅग्स :Tripura Election Results 2018त्रिपुरा निवडणूक निकाल 2018Northeast Election Results 2018ईशान्य भारत निवडणूक निकाल 2018north eastईशान्य भारतBJPभाजपाcongressकाँग्रेस