BJP On National Herald Case: नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरू आहे. याविरोधात एकीकडे काँग्रेसचे दिग्गज नेते रस्त्यावर उतरले असताना दुसरीकडे भाजपने पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या, "जे तुरुंगातून जामिनावर आहेत, त्यांनी दिल्लीला घेराव घालण्याची घोषणा केली आहे. कारण काय तर, भ्रष्टाचार पकडला गेला आहे."
स्मृती इराणी पुढे म्हणाल्या की, 'तपास यंत्रणेवर दबाव आणण्यासाठी काँग्रेसशासित राज्यांतील वरिष्ठ नेत्यांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे. हे लोक उघडपणे एजन्सीवर दबाव आणत आहेत. हे काँग्रेस पक्षाचे धोरण आहे का? 1930 च्या दशकात असोसिएट जनरल लिमिटेड (AJL) नावाची कंपनी स्थापन झाली, ज्याचे काम वृत्तपत्र प्रकाशित करणे होते. त्याचे पाच हजार भागधारक होते. ज्या वृत्तपत्रासाठी स्वातंत्र्यसैनिकांची हमी निश्चित करण्यात आली होती, त्या वृत्तपत्राचा भागभांडवल एका कुटुंबाला देण्यात आला,' असा आरोप इराणी यांनी केला.
'90 कोटींचे कर्ज माफ केले'स्मृती इराणी पुढे म्हणाल्या की, '2008 मध्ये या कंपनीने 90 कोटींचे कर्ज घेतले आणि प्रॉपर्टीच्या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. 2010 मध्ये यंग इंडिया नावाची कंपनी 5 लाख रुपयात स्थापन झाली, ज्यामध्ये राहुल गांधी संचालक म्हणून सामील झाले. फक्त 75 टक्के हिस्सा त्यांचा होता, बाकीचा हिस्सा त्यांच्या आई सोनिया गांधींसह इतर काही लोकांकडे होता. यानंतर एजेएलचे 9 कोटी शेअर्स यंग इंडियाला दिले गेले. या कंपनीचे 99 टक्के शेअर्स यंग इंडियाला मिळाले. यानंतर काँग्रेस पक्ष एजेएल कंपनीला 90 कोटींचे कर्ज देते आणि नंतर ते माफही करते.'
काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्यांना प्रश्न...स्मृती पुढे म्हणाल्या की, 'आज माझा प्रश्न त्या लोकांना आहे, ज्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. काँग्रेस पक्षाला लोकशाही कार्यात सहभागी व्हावे यासाठी देणग्या दिल्या. काँग्रेस पक्षाने आपला पैसा गांधी घराण्याच्या मालकीच्या कंपनीला अर्पण करावा, हा अशा देणगीदारांचा हेतू होता का? 2016 मध्ये यंग इंडियाने कबूल केले होते की, 6 वर्षांच्या कालावधीत त्यांनी कोणतेही धर्मादाय कार्य केले नाही.'
2000 कोटींची संपत्ती वाचवण्याचा प्रयत्न त्या पुढे म्हणाल्या की, 'मला या लोकांना आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. जर तुम्ही राहुल गांधींना भेटलात तर त्यांना विचारा की त्यांचा डेक्स मर्चेंडाइज प्रायव्हेट लिमिटेडशी काय संबंध आहे? राहुल गांधींच्या सांगण्यावरून काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते आज जे काही करत आहेत, ते लोकशाही वाचवण्यासाठी नाही, थर गांधी परिवाराची 2000 कोटींची संपत्ती वाचवण्याचा प्रयत्न आहे, असा आरोपही इराणी यांनी केला.