BJP on Rahul Gandhi: काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा नेपाळच्या एका क्लबमधील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओ राहुल गांधी एका चीनी तरुणीसोबत असून, त्यांच्यासमोर दारुच्या बाटल्याही दिसत आहेत. त्या व्हिडिओनंतर आता राहुल यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरुन भाजपने राहुल गांधींना टोला लगावला आहे.
आता व्हायरल होत असलेला व्हिडिओ तेलंगाणामधील एका सभेपूर्वीचा असून, राहुल गांधी काही नेत्यांसोबत बसलेले दिसत आहेत. सभा सुरू होण्यापूर्वी राहुल गांधी इतर नेत्यांना विचारताना आहेत की, ‘मला सभेत नेमकं काय बोलायचं आहे?’ या व्हिडिओवरुन भाजपने राहुल गांधींची खिल्ली उडवली आहे. 'तुम्ही खाजगी परदेश दौरे आणि नाईट क्लबमध्ये राजकारण करता, तेव्हा असं होतं असतं,' अशी टीका भाजपकडून करण्यात येत आहे.
भाजपचे सोशल मीडिया प्रभारी अमित मालवीय यांनी राहुल गांधींचा हा व्हायरल व्हिडिओ ट्विट करत म्हटले आहे की, "काल तेलंगणातील रॅलीपूर्वी राहुल गांधींनी नेत्यांना विचारले की थीम काय आहे? मला काय बोलायचे आहे? जेव्हा तुम्ही खासगी आयुष्य आणि नाईटक्लबींमध्ये राजकारण करता, तेव्हा असे घडते." नेपाळच्या व्हिडिओवरही अमित मालवीय यांनी राहुल गांधींवर ताशेरे ओढले होते.
ओवेसींचा राहुलवर हल्लाबोलया व्हिडिओवर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही राहुल यांच्यावर हल्लाबोल करत म्हटले की, "जेव्हा तुम्हाला काय बोलावं हेच कळत नाही, तेव्हा तुम्ही लोकांना काय संदेश द्याल? आणि लोक तुम्हाला का समर्थन देती? तुम्ही टीआरएसशी कसं लढणार?", असे सवाल ओवेसींनी केले.