शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

राहुल गांधी देशद्रोही, खोटं बोलून देशाची बदनामी करतात...भाजपचा नेत्याचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 17:40 IST

BJP On Rahul Gandhi: भारताला अस्थिर करणाऱ्या माध्यमांसह आंतरराष्ट्रीय शक्तींशी राहुल गांधींचा संबंध असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

Rahul Gandhi News : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून, विविध मुद्द्यावरुन भाजप आणि काँग्रेसच्या खासदारांमध्ये वाद-विवाद पाहायला मिळत आहेत. दरम्यान, आज लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा देशविरोधी शक्तींशी संबंध असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला. फ्रेंच मीडिया 'मीडियापार्ट'मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टचा हवाला देत भाजप खासदार संबित पात्रायांनी दावा केला की, भारताला अस्थिर करणाऱ्या माध्यमांसह आंतरराष्ट्रीय शक्तींशी राहुल गांधींचा संबंध असून, राहुल गांधी देशद्रोही असल्याचा आरोप त्यांनी केला. 

'राहुल गांधी देशद्रोही'संबित पात्रा म्हणाले, जेव्हा तुमच्याकडे बोलण्यासाठी कोणताही मुद्दा नसतो, तेव्हा तुम्ही स्वतःचे मुद्दे तयार करून देशाच्या विरोधात असे मुद्दे निर्माण करता आणि जागतिक स्तरावर देशाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातो. राहुल गांधी हेच करत आहेत, म्हणूनच मी त्यांना देशद्रोही म्हटले. जे लोक वस्तुस्थितीच्या आधारे नव्हे, तर खोटे बोलून देशाची बदनामी करतात...त्यांना देशद्रोही नाही, तर काय म्हणायचे? राहुल गांधी देशद्रोही आहेत, असे म्हणण्यास मला अजिबात संकोच नाही, अशी टीका पात्रांनी केली.

सोरोस, OCCRP आणि यूएस डीप स्टेट...अब्जाधीश गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस आणि काही यूएस-आधारित एजन्सी, 'ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट' आणि राहुल गांधी यांचे त्रिकूट भारताला अस्थिर करण्याचा आणि शासन बदलासाठी लोकांमध्ये असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा पात्रा यांनी केला. 'मीडियापार्ट' रिपोर्टचा हवाला देत पात्रा म्हणाले की, 'OCCRP चे अनेक खंडांमध्ये 50 हून अधिक मीडिया पार्टनर आहेत आणि ते त्यांच्या कामासाठी निधी देण्यासाठी जॉर्ज सोरोस आणि अमेरिकेतील भारतविरोधी शक्तींवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. जर त्यांना 70 टक्के संसाधने एकाच स्त्रोताकडून मिळत असतील तर ते तटस्थ राहू शकत नाहीत.'

राहुल गांधींनी ओसीसीआरपीच्या अहवालाच्या आधारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला लक्ष्य करण्यासाठी पत्रकार परिषदही घेतली. ब्राझीलने एका खाजगी भारतीय कंपनीद्वारे निर्मित कोविड लस, कोवॅक्सिनसाठी $324 मिल्यनची ऑर्डर रद्द केल्याच्या OCCRP अहवालानंतर गांधींनी जुलै 2021 मध्ये सरकारवर हल्ला केला. हा भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न आहे.  ओसीसीआरपी अहवाल आणि भारतीय बाजारातील शेअर्सच्या किमती कमी करण्याच्या उद्देशाने भारतीय उद्योगपतींवर हल्ला करणाऱ्या मीडिया आउटलेट्सनंतर गांधींनी पेगासस मुद्द्यावर सरकारला टीका केल्याचेही पात्रांनी सांगितले.

OCCRP आणि राहुल एकचपात्रा पुढे म्हणतात, ओसीसीआरपीने नॅशनल हेराल्ड प्रकरणात गांधी आणि त्यांची आई सोनिया गांधी यांच्याविरुद्धच्या कायदेशीर कारवाईला 'राजकीयदृष्ट्या प्रेरित' म्हटले होते. ओसीसीआरपी आणि राहुल गांधी हे दोन शरीर आणि एक आत्मा आहेत. आपले म्हणणे मांडताना पात्रांनी गांधींच्या काही लोकांसोबत झालेल्या भेटींचाही उल्लेख केला ज्यांनी भारताच्या हिताच्या विरोधात काम केल्याचा आऱोप केला. ते म्हणाले की, हा निव्वळ योगायोग नाही, तर ही मिलीभगत आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की भारताने पुढे जावे असे राहुल यांना वाटत नाही. राहुल गांधींना भारताची संसद चालवायची नाही. काँग्रेस 'फेक' बातम्यांमुळे कामकाजात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाParliamentसंसद