राहुल गांधी काँग्रेसच्या 'गाली गँग' चे प्रमुख, भाजपाची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 03:10 PM2019-04-12T15:10:24+5:302019-04-12T15:11:27+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात भारतीय जनता पार्टीने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

BJP Panel Meets EC Alleging Rahul Gandhi For Foul Language Against Modi | राहुल गांधी काँग्रेसच्या 'गाली गँग' चे प्रमुख, भाजपाची टीका 

राहुल गांधी काँग्रेसच्या 'गाली गँग' चे प्रमुख, भाजपाची टीका 

googlenewsNext

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात भारतीय जनता पार्टीने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना खालच्या शब्दाचा वापर करुन मर्यादा ओलांडली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे 'गाली गॅंग' चे प्रमुख आहेत अशी टीका भारतीय जनता पार्टीकडून करण्यात आली आहे. 

भाजपाचे नेते मुख्तार अब्बास नकवी यांनी भाजपाच्या शिष्टमंडळासह केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्तार अब्बास नकवी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. त्याचसोबत राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाला केल्याचं मुख्तार अब्बास नकवी यांनी सांगितले. 


भाजपा नेत्या निर्मला सीतारामन आणि मुख्तार अब्बास नकवी यांनी सांगितले की, सुप्रीम कोर्टाच्या नावावर वारंवार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी खोटं बोलत आहे. काँग्रेसमध्ये झूठमेव जयतेच्या आधारावर कोणताही पुरावा नसताना राफेल प्रकरणात खोटे आरोप लावत आहे. निवडणूक आयोगाकडे आम्ही राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर लक्ष ठेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

देशात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये काँग्रेस-भाजपा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मागील अनेक महिन्यांपासून राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात मोहीम आखली आहे. चौकीदार चोर है अशी घोषणा काँग्रेसकडून आणि राहुल गांधी यांच्याकडून वारंवार केली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार भाषणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व्यासपीठावरुन चौकीदार चोर है असा उल्लेख करत असतात. राफेल विमान खरेदी प्रकरणावरुन राहुल गांधी यांनी प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट केले आहे. राहुल यांच्या याच अभियानाला उत्तर म्हणून भाजपाकडून मै भी चौकीदार असं कॅम्पेन सुरु करण्यात आलं आहे. त्याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विरोधी पक्षांकडून मला शिव्या दिल्या जातात असा आरोप भाषणांमधून करण्यात येतो.  
 

Web Title: BJP Panel Meets EC Alleging Rahul Gandhi For Foul Language Against Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.