शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या अपमानाची आठवण, भाजपानं सुनावलं; जे.पी नड्डांचं खरगेंना खरमरीत पत्र
2
मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीत तीन नावे; भाजपाकडून कोणाचे नाव?
3
...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान
4
‘महाविकास’च्या जागावाटप चर्चेला सुरुवात; चर्चा सलग तीन दिवस सुरू राहणार
5
IND vs BAN : हिटमॅन Rohit Sharma चा पुन्हा फ्लॉप शो!  
6
NPS Vatsalya: दर महिन्याला ₹१००० गुंतवा, मुलांच्या रिटायरमेंटला मिळतील ₹३.८ कोटी; दीड लाखांचं पेन्शनही
7
धक्कादायक! उलट्या दिशेने धावली कोलकात्याहून अमृतसरला जाणारी ट्रेन, ड्रायव्हरला समजल्यावर...  
8
'बिग बॉस मराठी'साठी तरूण होस्ट हवा होता! केदार शिंदेंचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले- "महेशदादाला..."
9
देशात कसं लागू होणार 'एक देश, एक निवडणूक'; कॅबिनेट मंजुरीनंतर आता पुढे काय? जाणून घ्या
10
यंदाच्या निवडणुकीतून राज्यात किती जणींना मिळणार आमदार होण्याची संधी? २०१९ मध्ये २४ महिलांना मिळाली आमदारकी
11
मुंबईतील 'या' म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश
12
स्मिता पाटीलच्या लेकाचं करिअर वाचवण्यासाठी सलमान आला धावून, प्रतिक बब्बर म्हणाला- "त्याने मला सिकंदर सिनेमात..."
13
अरेच्चा! पॅरिस विमानतळावरच सुरु झाली हास्यजत्रेची रिहर्सल, टीमचा आता अमेरिका दौरा
14
‘वर्क वेल’ बनली जिल्हा बँकांची ‘लाडकी कंपनी’ सहकारातील भरतीचा घोळ; बँक म्हणते, ‘निविदा भरा’
15
बिहारमधील नवादा येथे गावगुंडांचा धुमाकूळ, गोळीबारानंतर दलितांची ८० घरं जाळली, मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात
16
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
17
तुम्ही Tupperware नाव ऐकलंच असेल! ₹५८६० कोटींचं कर्ज; कंपनी झाली दिवाळखोर, कारण काय?
18
किरण रावनं टाकलं आमिर खानच्या पावलांवर पाऊल, 'लापता लेडीज' आता या देशात वाजणार डंका
19
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव; शेतकऱ्यांबद्दल काय म्हणाले?
20
US Fedral Reserve नं कमी केले व्याजदर, शेअर बाजारात दिसू शकते तेजी; आणखी काय परिणाम होणार

जम्मू काश्मीरमध्ये भाजपा नेत्याने ठेवली गोमांस पार्टी

By admin | Published: September 13, 2015 11:53 AM

जम्मू काश्मीरमध्ये गोमांस बंदी सक्तीने लागू करावी असे आदेश हायकोर्टाने दिले असतानाच आता भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्यानेच गोमांस पार्टीचे आयोजन केले आहे.

ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि. १३ - जम्मू काश्मीरमध्ये गोमांस बंदी सक्तीने लागू करावी असे आदेश हायकोर्टाने दिले असतानाच आता भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्यानेच गोमांस पार्टीचे आयोजन केले आहे. या पार्टीला हिंदू व  मुस्लिम अशा दोन्ही समाजातील नागरिकांना बोलवणार असून मुस्लिमांना गोमांस दिले जाईल तर हिंदूंना शुद्ध शाकाहारी जेवण दिले जाणार आहे. दोन्ही समाजात बंधुत्वाची भावना निर्माण करण्यासाठी या पार्टीचे आयोजन केल्याचे या नेत्याचे म्हणणे आहे. 

दक्षिण काश्मीरमधील भाजपा नेते खुर्शिद अहमद मलिक यांनी रविवारी गोमांस (बीफ) पार्टीचे आयोजन केले आहे. बंधुत्व व धर्मनिरपक्षतेचा संदेश देण्यासाठी अशा प्रकारच्या पार्टीचे आयोजन केल्याचे मलिक यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच जम्मू काश्मीर हायकोर्टाने गोमांस बंदी सक्तीने लागू करण्याचे आदेश स्थानिक सरकारला दिले असून मुस्लिम समाजाने यावर आक्षेप घेतला आहे. हायकोर्टाचा हा निर्णय म्हणजे धर्मात हस्तक्षेप असल्याचे मुसलमानांचे म्हणणे आहे. अशा प्रकारच्या पार्टीसाठी पक्षाची परवानगी घेतली का असा सवाल विचारला असता मलिक म्हणाले, मी पक्षात मुस्लिमांचा विकास करण्यासाठी आलो आहे. मी मस्जिदमध्ये जावं की नाही हे मी पक्षाला विचारु का ?, या पार्टीचे पक्षाशी काहीही देणेघेणे नाही असे मलिक यांनी स्पष्ट केले.