भाजपने काठमांडू येथील एका नाईट क्लबमधील राहुल गांधी यांचा व्हिडीओ जारी केल्यानंतर, काही तासांतच काँग्रेसने भाजपला जशास तसे उत्तर दिले आहे. काँग्रेसने राज्यसभा खासदार आणि भाजपचे जेष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांचा एका पार्टीत शॅम्पेनची बाटली पॉप करतानाचा फोटो सोशल मिडियावर टाकला आहे. हा फोटो काँग्रेस नेते बीव्ही श्रीनिवास यांनी 'पहचान कौन?' असे कॅप्श देत शेअर केला आहे.
भाजप समर्थकांनी राहुल गांधी यांचा व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. एवढेच नाही, तर तेथे त्यांच्या सोबत उभी असलेली महिला ही चीनची राजदूत असल्याचेही म्हणण्यात आले आहे. यानंतर, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांनी ट्विटर अकाउंटवर प्रकाश जावडेकर यांचा फोटो ट्विट केला आहे. या फोटोत जावडेकर हातात शॅम्पेनची बॉटल ओपन करताना दिसत आहेत. यात ते पार्टी एन्जॉय करताना दिसत आहेत.
सुरजेवाला म्हणाले, 'राहुल गांधी हे एका मित्राच्या लग्नासाठी काठमांडू येथे गेले होते. ते खासगी दौऱ्यावर होते. पण, भाजपचे लोक ऊर्जा संकट आणि महागाई सारख्या मुद्द्यांवर उत्तर का देत नाहीत. त्यांच्याकडे केवळ राहुल गांधींवर बोलण्यासाठीच संपूर्ण वेळ आहे.'
मोदींप्रमाणे न बोलावता पाकिस्तानात तर नाही गेले - सुरजेवालासुरजेवाला ट्विट करत म्हणाले, 'एखाद्याच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये उपस्थित राहण्यात गैर काय? संघाच्या लोकांना याची भीती का वाटते? संघाचे लोक खोटे का पसरवत आहेत? आपण सर्वच जण खाजगी कार्यक्रमांत सहभागी होत असोतो. एवढेच नाही, तर राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींप्रमाणे, न बोलावताच पाकिस्तानचा दौरा तर नाही केला. ते आपला मित्र असलेल्या एका देशात मित्राच्या लग्नात सहभागी होण्यासाठी गेले होते.'
तत्पूर्वी मंगळवारी सकाळीच, भाजप नेते अमित मालवीय यांनी एक ट्विट करत, ' जेव्हा मुंबई सीज होती, तेव्हा राहुल गांधी नाइट क्लबमध्ये होते. जेव्हा त्यांच्या पक्षात स्फोटक स्थिती असते, तेव्हा ते असे करत असतात.' अमित मालवीय यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे.