नितीन अग्रवाल नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने झारखंड विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून गुरु वारी पक्षाचे झारखंड निवडणूक प्रभारी ओम माथूर यांनी गाभा समितीच्या पदाधिकाऱ्यांशी निवडणुकीवर चर्चाही केली. बैठकीस मुख्यमंत्री रघुवर दास, प्रदेश अध्यक्ष लक्ष्मण गिलुआ, केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा, संघटन मंत्री धर्मेंद्र पाल सिंह, प्रदेश प्रभारी राम विचार नेताम, सह निवडणूक प्रभारी सौदान सिंह आणि नंदकिशोर यादव उपस्थित होते.
सूत्रांनुसार या बैठकीत विधानसभेच्या तयारीचा आढावा घेतला गेला व संभाव्य उमेदवारांच्या नावावर चर्चा केली गेली. नऊ नोव्हेंबर रोजी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीसमोर ही नावे ठेवली जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत होणाºया या बैठकीत राज्याच्या ८१ विधानसभा जागांसाठी उमेदवारांची नावे निश्चित केली जातील. शुक्र वारी झारखंड प्रदेश कोर ग्रुपची बैठक अमित शहा आणि पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत होईल. या बैठकीतही उमेदवारांच्या नावावर चर्चा होईल. २०१४ मध्ये भाजपने राज्यात ७२ जागा लढवून ३७ जिंकल्या होत्या. त्यानंतर भाजपने मित्र पक्ष आजसूसोबत सरकार स्थापन केले होते.