भाजपा स्थापना दिवस : पक्ष कार्यकर्त्यांनी आज एक वेळच्या जेवणाचा त्याग करावा, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 01:06 PM2020-04-06T13:06:50+5:302020-04-06T13:48:28+5:30
'कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या जागतीक संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने देशाचे नेतृत्व करत आहेत, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. यासंकटातून बाहेर पडण्यासाठी संपूर्ण जग मोदींकडे मोठ्या आशेने पाहत आहे,” असेही नड्डा म्हणाले.
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्ष आज आपला 40वा स्थापना दिवस साजरा करता आहे. या निमित्ताने पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांनी कार्यकर्त्यांना काही सूचनाही दिल्या आहेत. तसेच 'पक्ष कार्यकर्त्यांनी आजच्या दिवस एक वेळच्या जेवणाचा त्याग करावा आणि लॉकडाऊनच्या काळात ज्यांना कष्ट सोसावे लागले त्यांच्या प्रति सहानुभूती व्यक्त करावी,' असे आवाहन केले आहे.
'कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या जागतीक संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने देशाचे नेतृत्व करत आहेत, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. यासंकटातून बाहेर पडण्यासाठी संपूर्ण जग मोदींकडे मोठ्या आशेने पाहत आहे,” असेही नड्डा म्हणाले.
पक्षाच्या 40व्या स्थापना दिना निमित्त सर्व कार्यकर्त्यांनी 40 जणांची भेट घ्यावी आणि त्यांना पीएम केयर्स फंडात 100 रुपये दान करण्याचे आवाहन करावे, असेही नड्डा यांनी कार्यकर्त्यांना सागितले. यावेळी नड्डा यांनी कोरोनासारख्या कठीन परिस्थितीतही आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचारी, डॉक्टर, सफाई कर्मचारी, बँक आणि पोस्ट ऑफिसचे कर्मचारी आदिंचेही आभार मानले.
जे लोक क्वारंटीनमध्ये आहेत त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधून त्यांची हिम्मत वाढवायची आहे. तेसच पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही यशस्वीपणे पक्षाची वाटपाच करू, असेही नड्डा म्हणाले.
यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत, “संपूर्ण भारत देश कोरोना संकटाचा सामना करत असातानाच आज आपल्या पक्षाचा 40 वा स्थापनादिवस आहे. मी भाजपा कार्यकर्त्यांना आवाहन करतो, की त्यांनी पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. तसेच गरजूंची मदत करवी आणि सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करा, चला भारत कोरोनामुक्त करूया,' असे म्हटले आहे.
जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी 6 एप्रिल 1980 रोजी भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. यानंतर हा पक्ष आणीबाणीनंतर 1977ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत इंदिरागांधींच्या विरोधात मैदानात उतरला होता.