शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
2
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
3
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
4
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
5
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
6
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
8
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
9
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
10
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
11
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
12
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
13
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
14
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
15
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
16
उदय सामंतांविरोधात ठाकरेंचा उमेदवार ठरला; पक्षप्रवेश होताच हाती मिळाला AB फॉर्म
17
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 
18
"मुलीला शिकवलंस तर सुशिक्षित नवरा कुठून आणणार?", लोकांचे टोमणे; मजुराची लेक झाली अधिकारी
19
Maharashtra vidhna Sabha 2024: शिंदेंच्या शिवसेनेचे पावशे निवडणूक लढविण्यावर ठाम
20
मोठी बातमी! "उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला, जो शब्द..."; संभाजी ब्रिगेडनं युती तोडली

सरकार कसं चालवायचं हे तुम्हाला कधी कळलंच नाही; जेपी नड्डांची खर्गेंवर सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 12:33 PM

Parliament Special Session : मोदी सरकारने महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ऐतिहासिक पाऊल टाकत महिला आरक्षण विधेयक मंजूर केले.

Women's Reservation Bill : मोदी सरकारने महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ऐतिहासिक पाऊल टाकत महिला आरक्षण विधेयक मंजूर केले आहे. महिला आरक्षण विधेयक आज राज्यसभेत मांडले जात आहे. लोकसभेत ४५४ खासदारांनी विधेयकाला पाठिंबा दिला. हे विधेयक मंजूर झाल्याने महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. खरं तर लोकसभेत ४५४ खासदारांनी महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा दिला, तर AIMIM चे असदुद्दीन ओवेसी आणि महाराष्ट्रातील खासदार इम्तियाज जलील यांनी विरोधात मतदान केले.

दरम्यान, या विधेयकावरून चांगलेच राजकारण तापले आहे. काँग्रेसने या विधेयकाला पाठिंबा दिला असला तरी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या एका मागणीवरून भाजपा आणि काँग्रेसचे दोन्ही राष्ट्रीय अध्यक्ष आमनेसामने आले आहेत. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी खर्गे यांना प्रत्युत्तर देताना सडकून टीका केली. खर्गेंवर बोलताना नड्डा म्हणाले की, तुम्हाला महिला आरक्षण विधेयक नियमांशिवाय लवकर मंजूर करायचे आहे, त्यामुळेच तुम्हाला सरकार कसे चालवायचे हे कळत नाही आणि म्हणूनच तुम्ही इथे विरोधी पक्षात बसला आहात.

राहुल गांधींना डिवचले मल्लिकार्जुन खर्गेंशिवाय खासदार राहुल गांधींना देखील नड्डांनी लक्ष्य केले. "काँग्रेसला महिला आरक्षण विधेयकावर घाई करायची आहे, पण वायनाडची जागाच महिलांसाठी राखीव होईल हे त्यांना माहीत नाही", अशा शब्दांत त्यांनी राहुल गांधींना त्याच्या मतदारसंघावरून डिवचले. तसेच देशातील महिला कधीच दुर्बल आणि गरीब राहिल्या नाहीत. आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे असून अनेक गोष्टींमध्ये पुरुषांना मागे टाकले आहे, असेही यावेळी नड्डांनी नमूद केले. 

दरम्यान, राज्यसभेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरू आहे. यावर अनेक खासदारांनी पाठिंबा दर्शवला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी चर्चेदरम्यान सांगितले की, महिलांसाठी आरक्षण विधेयक आणणे म्हणजे त्यांच्यावर उपकार करणे नाही. कारण महिलांचा आदर करणे हिच आपली संस्कृती आहे.

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीWomen Reservationमहिला आरक्षण