नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी कोरोना लॉकडाऊन, भारत आणि चीनमधील तणाव यासह विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर हल्लाबोल करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने टीकास्त्र सोडत आहेत. मात्र त्याला आता भाजपाने प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधी हे खोट्या बातम्या पसरवत आहेत. तुम्ही आणि तुमच्या आईंनी चीनकडून पैसे घेतले असा गंभीर आरोप नड्डा यांनी केला आहे.
राहुल गांधी यांनी वृत्तपत्रातल्या काही बातम्यांचा आधार घेत सोशल मीडियाचा गैरवापर आणि पीएम केअर्स फंडाबद्दल प्रश्न विचारले होते. त्यावरून नड्डा यांनी जोरदार टीका केली आहे. त्यासोबतच तुमचं सगळं करियर हे खोट्या बातम्या पसरविण्यातच गेलं असा टोलाही लगावला आहे. 'तुम्ही आणि तुमच्या मातोश्रींनी राष्ट्रीय हिताकडे दुर्लक्ष करत चीनकडून पैसे घेतले. यापेक्षा खालच्या पायरीवर कोणी येऊ शकतं का?' असं नड्डा यांनी म्हटलं आहे.
जे. पी. नड्डा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे ट्विट करत राहुल आणि सोनिया गांधींवर हल्लाबोल केला आहे. देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास आहे. पीएम केअर फंडातील प्रत्येक पैशाचा हिशेब आहे आणि लोकांच्या हितासाठीच तो पैसा वापरला जातोय असंही त्यांनी सांगितलं आहे. काँग्रेस आणि भाजपामध्ये ट्विर वॉर रंगलेलं पाहायला मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
काँग्रेसचे माजी प्रवक्ते संजय झा यांनी काँग्रेसच्या 100 नेत्यांनी पक्षातील अंतर्गत परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त करणारे पत्र काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवलं होतं असा दावा केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी या संबंधीचं एक ट्वीट केलं आहे. तसेच नेतृत्वासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी पक्षांतर्गत निवडणूक घेण्याची मागणी नेत्यांनी केल्याचा दावा देखील संजय झा यांनी केला आहे. पक्ष विरोधी कारवाया व पक्ष शिस्तभंगांची कारवाई करत काही दिवसांपूर्वीच झा यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे.
निलंबनाची कारवाई केल्यानंतर आता झा यांना काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेसने आपला मार्ग योग्य प्रकारे निवडला नाही तर पक्ष उद्धवस्त होईल असं म्हटलं होतं. तसेच एका लेखामध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये विरोधी विचारांबद्दल असहिष्णुता आहे असं म्हटलं आहे. काँग्रेस भाजपावर चुकीच्या पद्धतीने लोकशाही चालवण्याचा आरोप करते. तर दुसरीकडे स्वत:च्या पक्षामध्ये मात्र राजेशाही संस्कृतीला पाठिंबा देते असंही झा यांनी म्हटलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
Bihar Flood : नि:शब्द! बिहारला पुराचा तडाखा, मन हेलावून टाकणारा फोटो व्हायरल
"काँग्रेसच्या 100 नाराज नेत्यांनी सोनियांना पाठवलेलं पत्र, केली होती 'ही' मागणी"
...म्हणून रोहित पवारांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार
Video - कडक सॅल्यूट! 16 तास पाण्यात अडकलेल्या तरुणाची वायुदलाने अशी केली सुखरुप सुटका
CoronaVirus News : कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरस आला! संक्रमणाचा धोका दहापटीने वाढला
CoronaVirus News : चिंता वाढली! कोरोनावर मात केल्यानंतरही रुग्णांना गाठावं लागतंय रुग्णालय
CoronaVirus News : आपलेही झाले परके! ...अन् मुलांवर आली वडिलांचा मृतदेह सायकलवरून नेण्याची वेळ