चंदीगड : हरयाणामध्ये २१ आॅक्टोबर रोजी होणाºया विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने रविवारी जाहीरनामा प्रसिद्ध केला. राज्यात पुन्हा सत्तेवर आल्यास अनुसूचित जातीच्या तीन लाख लोकांना तारणाशिवाय तर तीन लाख शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. गरीब वर्गातील मुलींना मोफत शिक्षण तसेच २५ लाख युवकांना कौशल्यविकासाचे प्रशिक्षण देण्यात येईल असे या जाहीरनाम्यात म्हटले आहे.भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पत्रकारांना सांगितले की, राज्यातील २५ लाख युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यासाठी ५०० कोटी रुपयांची योजना राबविण्यात येईल. वृद्ध लोकांना तीन हजार रुपये पेन्शन देण्यात येईल, हरयाणा क्षयरोगमुक्त केला जाईल व शेतकºयांचे उत्पन्न २०२२पर्यंत दुप्पट करण्यात येईल अशी आश्वासनेही भाजपने आपल्या जाहीरनाम्यात दिली आहेत. हरयाणासाठी काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात शेतकºयांना कर्जमाफी देण्यात येईल असे म्हटले आहे. त्यामुळे निवडणूक प्रचारातही हा मुद्दा कळीचा बनला आहे.२ हजार आरोग्य केंद्रे स्थापन करणारभाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सांगितले की, हरयाणात भाजप पुन्हा सत्तेत आल्यास २ हजार आरोग्य केंद्रे स्थापन केली जातील. क्रीडाविकासासाठी राज्यात १ हजार केंद्रे सुरु करण्यात येतील, असेही आश्वासन त्यांनी दिले.
तीन लाख शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देण्याचे भाजपचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 4:52 AM