नवी दिल्ली : केरळ निवडणुकीत डाव्या पक्षांच्या विजयानंतर काढलेल्या रॅलीत भाजपाच्या एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ रविवारी भाजपा कार्यकर्त्यांनी माकप कार्यालयाच्या बाहेर निदर्शने केली. निदर्शनानंतर ६०० कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या अनेक तुकड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि तेथे नाकेबंदी केली. या वेळी माकपचे कार्यकर्तेही कार्यालयातून बाहेर आले होते. माकप कार्यालयाबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी निदर्शने करताना तेथील माकपच्या फलकाची तोडफोड केली. विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून आपल्या कार्यकर्त्यांवर माकपतर्फे हिंसक हल्ले होत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. जनतेने दिलेल्या कौलाचा डावी आघाडी ‘भंग’ करीत असल्याचा आरोप शनिवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला होता.
पक्ष कार्यकर्त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ भाजपाची दिल्लीत निदर्शने...
By admin | Published: May 23, 2016 4:05 AM