शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत वरुण गांधी आणि मनेका गांधी यांना स्थान नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 14:42 IST

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज पक्षाच्या 80 सदस्यांची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे.

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाकडून नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा गुरुवारी करण्यात आली. पण, यात भाजप नेते खासदार वरुण गांधी आणि त्यांच्या आई मनेका गांधी यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून बाहेर ठेवण्यात आलं आहे. वरुण गांधी मागील काही काळापासून सरकारच्या धोरणांविरोधात आणि आता नुकत्याच झालेल्या लखीमपूरच्या घटनेवरुन सरकारवर टीका करत होते. त्यांच्या याच टीकेचा फटका त्यांना बसला आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज पक्षाच्या 80 सदस्यांची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री अमित शहा आणि राजनाथ सिंह यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त अभिनेते मिथून चक्रवर्ती आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनाही या राष्ट्रीय कार्यकारी स्थान मिळालं आहे. 

या नेत्यांचा समावेशभाजपने राष्ट्रीय कार्य समितीमध्ये 80 सदस्यांचा समावेश केला आहे. यात रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, डॉ. हर्षवर्धन, एस जयशंकर, गिरीराज सिंह, रमेश बिधुरी, मनोज तिवारी, श्रीपाद नायक, मीनाक्षी लेखी, अनुराग ठाकूर, डॉ जितेंद्र सिंह, पहलादा जोशी, निर्मला सीतारमण, मुरलीधरन, नरेंद्र सिंह तोमर, ज्योतिरादित्य सिंधिया, नरोत्तम मिश्रा, धर्मेंद्र प्रधान, हरदीप सिंग पुरी, सोम प्रकाश, ओम प्रकाश माथुर, गजेंद्र सिंह शेखावत, जसकौर मीना, जी किशन रेड्डी, स्मृती इराणी, मुख्तार अब्बास नकवी, संतोष गंगवार, साध्वी निरंजन ज्योती, मिथुन चक्रवर्ती, अनिल जैन, संजीव बाल्यान, दिनेश त्रिवेदी, अनिर्बन गांगुली इत्यादींचा समावेश आहे.

13 उपाध्यक्षांची निवडयासह राष्ट्रीय उपाध्यक्षपदासाठी 13 सदस्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये छत्तीसगडचे डॉ.रमण सिंह, राजस्थानचे वसुंधरा राजे शिंदे, बिहारचे राधा मोहन सिंग, चंदीगडचे सौदन सिंह, ओडिशाचे बैजयंत जय पांडा, झारखंडचे रघुवर रस, पश्चिम बंगालचे दिलीप घोष, बेबी राणी मौर्य आणि रेखा यांचा उत्तर प्रदेशातून समावेश आहे. तर, गुजरातमधून डॉ.भारती बेन शियाल, तेलंगणातून डीके अरुणा, नागालँडचे एम चुबा आओ आणि केरळमधील अब्दुल्ला कुट्टी यांचा समावेश करण्यात आला आहे. 

टॅग्स :BJPभाजपाVarun Gandhiवरूण गांधीManeka Gandhiमनेका गांधीLakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचार