शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

Tripura, Nagaland, Meghalaya's Election Result: निकालापूर्वीच भाजप तयार! त्रिपुरा व मेघालयात रंगू शकते सत्तानाट्य; नेत्यांना पाठविले मोहिमेवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2023 6:05 AM

Tripura, Nagaland, Meghalaya's Election Result:

- संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : त्रिपुरा, नागालँड व मेघालय या तीन राज्यांत सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. त्यातील त्रिपुरा व मेघालयात तोडफोडीची शक्यता दिसते. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा, केंद्रीय मंत्री किरण रिजीजू, माजी मुख्यमंत्री विप्लव देव, ईशान्येकडील राज्यांचे समन्वयक संबित पात्रा यांच्यासह सहा नेत्यांना निवडणूक निकालापूर्वी तीन राज्यांत तैनात केले आहे.

तिन्ही राज्यांतील निवडणूक निकालांपूर्वीच दिल्लीतील भाजप मुख्यालयात जल्लोषाची तयारी केली जात आहे. उद्या होळी खेळली जाणार आहे, असे म्हटले जात आहे कारण भाजप दोन राज्यांत पुन्हा सरकार स्थापन करणार आहे. निवडणूक निकालांपूर्वीच एक्झिट पोलने त्रिपुरा व नागालँडमध्ये भाजप स्पष्ट बहुमताने सरकार स्थापन करणार असल्याचे भाकीत वर्तविले आहे. तर मेघालयात त्रिशंकू सरकार स्थापन करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

त्रिपुरात भाजपचे सरकार आल्यास तेथे प्रथमच महिला मुख्यमंत्री होऊ शकते. प्रतिमा भौमिक यांना निवडणूक लढविण्यासाठी पाठवले, तेव्हाच याबाबतची शक्यता व्यक्त केली जात होती. 

आसाम  भाजपसाठी तोडफोड करण्यातील अग्रणी हेमंत बिस्वा सरमा यांनी पूर्ण तयारीनिशी अगरतळामध्ये ठाण मांडले आहे. भाजप नेते संबित पात्रा व माजी मुख्यमंत्री विप्लव देव हे त्रिपुरामध्ये यासाठीच गेले आहेत. त्रिपुरामध्ये सलग दुसऱ्यांदा भाजपने सरकार स्थापन करणे, ही ऐतिहासिक घटना होईल. अशाच प्रकारे नागालँडमध्ये भाजपचे सरकार स्पष्ट बहुमताने स्थापन होणे निश्चित मानले जाते. 

मेघालयत्रिशंकू निकालांची शक्यता व्यक्त केली जात आहे. येथे भाजपच्या तोडफोडीचा कस लागणार आहे. येथे कशा प्रकारे सरकार स्थापन होऊ शकते किंवा राष्ट्रपती राजवट लावून भाजप मागील दाराने सरकार चालवतो, हे येणारा काळच ठरवेल. केंद्रीय मंत्री किरण रिजीजू व भाजप नेते ऋतुराज सिन्हा आधीपासूनच मेघालयात ठाण मांडून आहेत. तृणमूल उमेदवारांवर भाजपची नजर राहील.

त्रिपुराएक्झिट पोलबरोबरच भाजपचा अंदाज आहे की, त्रिपुरात भाजप बहुमताच्या ६० पैकी ३० या जादुई आकड्याच्या आसपास असेल. दोन-चार जागा कमी-जास्त मिळू शकतात. बहुमताला जागा कमी पडण्याच्या स्थितीत भाजप त्रिपुरात तीपरा मोथासमवेत युती करू शकतो, तसेच काही अपक्षांना आपलेसे करू शकतो. या सर्व हालचाली निवडणूक निकालानंतरच होऊ शकतात.

निधी जमविण्यात भाजप देशात आघाडीवरn २०२१-२२ या आर्थिक वर्षात देशात आठ राष्ट्रीय पक्षांचे ३२८९.३४ कोटी रुपयांचे उत्पन्न होते. त्यांतील निम्म्याहून अधिक रक्कम एकट्या भाजपला मिळाली, असे असोसिशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या स्वयंसेवी संस्थेने सांगितले.n भाजपने २०२१-२२ या आर्थिक वर्षात १९१७.१२ कोटी रुपयांचे उत्पन्न जाहीर केले व त्यातील ८५४.४६७ कोटी रुपये खर्च केले. भाजपनंतर सर्वाधिक ५४५.७४५ कोटी रुपयांची रक्कम तृणमूल काँग्रेसला मिळाली आहे. n २०२१-२२मध्ये काँग्रेसचे एकूण उत्पन्न ५४१.२७५ कोटी रुपये होते. त्यातील ७३.९८ टक्के पैसे खर्च करण्यात आले. 

टॅग्स :Tripuraत्रिपुराAssamआसामElectionनिवडणूकBJPभाजपा