नवी दिल्लीः देशात कोरोनाचं महाभयंकर संकट आहे. त्याला थोपवण्यासाठी मोदी सरकारही प्रयत्नशील आहे. तिकडे सीमेवर चीनकडून आगळीक सुरू आहे. त्यालाही मोदी सरकारनं योग्य प्रकारे सामोरे जात आहे. विशेष म्हणजे अशा काळात नेपाळही भारताची डोकेदुखी वाढवली आहे. चीनच्या नादी लागून नेपाळही भारताला आव्हान देण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच परिस्थितीवर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भाष्य केलं आहे. कोरोनामुळे बर्याच विकसित देशांचे वाईट परिणाम झाले आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आव्हान स्वीकारण्याची तयारी दाखवल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो, असं केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले आहेत. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उत्तराखंड जनसंवाद येथे जनतेला संबोधित करताना बोलत होते.आपल्या आभासी संवादात ते म्हणाले की, कोरोना साथीला थोपवण्यासाठी मोदींनी केलेल्या प्रयत्नांचं केवळ भारतानंच नव्हे, तर जागतिक आरोग्य संघटनेनंही कौतुक केलं आहे. तसेच राजनाथ सिंह हे नेपाळशी भारताचे असलेल्या संबंधांवरही बोलले आहेत. ते म्हणाले की, प्रथम यात्रेकरूंना मानसरोवरच्या दर्शनासाठी नाथूल पास मार्गावरून जावे लागत होते. ते खूप लांब होते, परंतु आता सीमा रस्ता संघटनेने लिपुलेखला जोडण्याचा मार्ग बनविला आहे. त्यामुळे मानसरोवर यात्रेसाठी नवीन मार्ग तयार केला आहे. हा 80 किमी लांबीचा रस्ता आहे, जो भारतीय क्षेत्रात बनलेला आहे. नेपाळला जर या मार्गाविषयी काही गैरसमज झाले असतील, तर ते संवादाद्वारे सोडविले जातील.
हेही वाचा
आठ वर्षे विम्याचे हप्ते भरल्यास विमा कंपनीला द्यावा लागणार क्लेम, Irdaiचे आदेश
पोस्टाच्या सहा जबरदस्त योजना; लॉकडाऊनच्या काळात गुंतवणूक करा अन् मिळवा मोठा लाभ