मुंबई: राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून केला जात आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी अनेकदा राफेल खरेदीवरुन मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे 'स्वच्छ कारभारा'चा दावा करणारं मोदी सरकार अडचणीत आलं आहे. यामधून सरकारची सुटका करण्यासाठी आता मराठमोळी अभिनेत्री पल्लवी जोशी सरसावली आहे. काही दिवसांपूर्वीच 'ग्रहण' मालिकेत दिसलेली अभिनेत्री पल्लवी जोशी आता मोदी सरकारवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांचं ग्रहण दूर करण्यासाठी पुढे आली आहे. भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये पल्लवी जोशी राफेल डील सोप्या शब्दांमध्ये सांगताना दिसत आहेत. यासाठी तिनं सोसायटीच्या सिक्युरिटी सिस्टीमचं उदाहरण दिलं आहे. 'सोसायटीच्या सिक्युरिटी सिस्टमसाठी आधीच्या सचिवांनी फ्रेंच कंपनीशी बोलणी केली होती. 10 वर्षांपासून ही बोलणी सुरू होती. या काळात सिक्युरिटी सिस्टिमसाठी वापरण्यात आलेलं तंत्रज्ञान जुनं झालं,' असं पल्लवी जोशी या व्हिडीओतून सांगते आहे.
Rafale Deal: मोदी सरकारवरील 'ग्रहण' दूर करण्यासाठी मराठमोळ्या अभिनेत्रीचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 10:19 PM