गुजरात विधानसभा निवडणूक : भाजपाच्या सहाव्या यादीत 13 पाटीदार उमेदवार, आनंदीबेन पटेल यांना नाही मिळालं तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 11:05 AM2017-11-27T11:05:09+5:302017-11-27T11:51:34+5:30

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपावरुन सुरू असलेल्या प्रचंड गोंधळामध्येच भाजपानं आपली सहावी आणि अंतिम यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 34 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

BJP releases sixth list of 34 candidates for Gujarat Election 2017 | गुजरात विधानसभा निवडणूक : भाजपाच्या सहाव्या यादीत 13 पाटीदार उमेदवार, आनंदीबेन पटेल यांना नाही मिळालं तिकीट

गुजरात विधानसभा निवडणूक : भाजपाच्या सहाव्या यादीत 13 पाटीदार उमेदवार, आनंदीबेन पटेल यांना नाही मिळालं तिकीट

Next

अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपावरुन सुरू असलेल्या प्रचंड गोंधळामध्येच भाजपानं आपली सहावी आणि अंतिम यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 34 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यासोबतच भाजपानं गुजरात विधानसभेसाठीच्या सर्वच्या सर्व 182 जागांवर आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. दरम्यान, या यादीमध्ये माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या नावाचा समावेश नाहीय, त्यांच्याऐवजी भूपेंद्र पटेल यांना तिकीट देण्यात आले आहे. कारण, आनंदीबेन पटेल यांनी निवडणूक लढवण्यास पूर्वीच नकार दिला होता. 

भाजपानं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर बंडखोरीचे सुरू झालेले प्रकरण उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवसापर्यंत सुरू आहे. काँग्रेस पक्षालाही या आव्हानाचा सामना करावा लागत आहे. 9 डिंसेबर आणि 14 डिसेंबरला गुजरातमध्ये मतदान होणार असून 18 डिसेंबरला गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.  

फोनवरुन अर्ज भरण्याचे निर्देश
यापूर्वी अशी माहिती समोर आली की, भाजपा पक्षात बंडखोरी मोठ्या प्रमाणात उफाळून आल्यानंच शेवटच्या दिवसापर्यंत सर्व उमेदवारांचे नाव जाहीर करण्यात आले नव्हते. शिवाय, उमेदवारांना फोनवरुनच अर्ज भरण्यास सांगण्यात आल्याचीही माहिती समोर आली होती, जेणेकरुन तिकीट रद्द झाल्यानंतर आपल्याच नेत्यांच्या विरोधाचा सामना करावा लागू नये. दरम्यान, भाजपानं सुरुवातीला 5 याद्या जाहीर करत 148 उमेदवारांची नावं जाहीर केली होती. यामध्ये भाजपानं चार पाटीदारांनाही उमेदवारी दिली आहे, ज्यात नरणभाई पटेल, रमणभाई पटेल, वल्लभ ककडिया आणि पंकज देसाई यांचा समावेश आहे. 


मागच्या दोन दशकांपासून गुजरातमध्ये भाजपाची एकहाती सत्ता आहे. ही सत्ता टिकवून ठेवण्याचे भाजपासमोर आव्हान आहे. भाजपाला प्रस्थापित सरकारविरोधात असणा-या लाटेचा सामना करावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधून येतात. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपाने गुजरातची लढाई प्रतिष्ठेची केली आहे.  मोदींच्या काळात भाजपाने इथे आपली पाळंमुळं अधिक  घट्टपणे रोवली. पण मोदी दिल्लीत गेल्यानंतर गुजरातमध्ये राजकीय उलथापालथी घडल्या. 

मोदी यांच्यानंतर आनंदीबेन पटेल यांची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण नंतर त्यांना हटवून त्यांच्या जागी विजय रुपानी यांना आणण्यात आले. याच दरम्यान गुजरातमध्ये पटेल समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी मोठे आंदोलन उभे राहिले. गुजरातमध्ये मोठया प्रमाणावर हिंसाचारही झाला. पटेल आरक्षण महत्वाचा मुद्दा बनला. गुजरातमध्ये पटेल समाजाने नेहमीच भाजपाला साथ दिली आहे. पण यंदाच्या निवडणुकीत पटेलांना सोबत ठेवण्याचे भाजपासमोर आव्हान आहे.

Web Title: BJP releases sixth list of 34 candidates for Gujarat Election 2017

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.