BJP : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत १५ नावांचा समावेश आहे. आतापर्यंत भाजपने ४ याद्या जाहीर केल्या असून महाष्ट्रातील २० नावे जाहीर केले आहेत, दरम्यान आज घोषित झालेल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही जागेचा समावेश नाही. या यादीत तामिळनाडूतील नावे आहेत.
ज्यांनी बुडालेले लवासा विकत घेतले, त्यांचे दिवस फिरले; मुंबई, गोव्यात ईडीने धाड टाकली
भाजपने पहिल्या यादीत १९५ नावे जाहीर केली आणि नंतर ७२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यानंतर ९ आणि १६ उमेदवारांची तिसरी आणि चौथी यादी जाहीर करण्यात आली. भाजपने आतापर्यंत महाराष्ट्र, हरियाणा, यूपी, गुजरात, राजस्थान, दिल्लीसह अनेक राज्यांतील २९२ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने आतापर्यंत जाहीर केलेल्या उमेदवारांच्या नावांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, मनोहर लाल खट्टर, स्मृती इराणी आणि पियुष गोयल या केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे.
आज जाहीर झालेल्या यादीत प्रसिद्ध अभिनेत्री राधिका सरथकुमार यांच्या नावाचाही समावेश आहे. या यादीत पुद्दुचेरी येथील एका नावाचा समावेश आहे.