लोकसभा निवडणुकासाठी भाजपने उमेदवारांची सहावी यादी जाहीर केली आहे, या यादीत राजस्थान आणि मणिपूरमधील उमेदवारांची नावे आहेत. राजस्थान येथील करौली-धोलपूरमधून इंदू देवी जाटव यांना उमेदवारी दिली आहे, तर कन्हैया लाल मीना यांना दौसामधून उमेदवारी दिली आहे. मणिपूरमधून भाजपाने थौनओजम बसंत कुमार सिंह यांना उमेदवारी दिली आहे. भाजपच्या या सहाव्या यादीत महाराष्टातील एकाही उमेदवाराचा समावेश नाही.
महाविकास आघाडीपासून आणखी एक नेता दुरावणार; जयंत पाटलांनी सगळंच सांगितलं
राज्यातील महायुतीतील जागावाटपाबाबत बैठका सुरू आहेत. भाजपने राज्यातील पहिली यादी जाहीर करत २० नावांची घोषणा केली होता. यानंतर भाजपने तीन उमेदवारांची घोषणा केली. सोलापूरमधून राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, काल काँग्रेसनेही राजस्थानमधील लोकसभेच्या जागांची घोषणा केली आहे. काँग्रेसने रविवारी तीन उमेदवारांची नावे जाहीर केली. राजस्थानमधून दोन आणि महाराष्ट्रातून एक उमेदवार रिंगणात उतरवला आहे. राजस्थानमधील जयपूरमधून प्रताप सिंह खचरियावास यांना तिकीट देण्यात आले. तर, जयपूरपूर्वी सुनील शर्मा यांना उमेदवारी जाहीर झाली होती. दरम्यान, दौसाचे आमदार मुरारी लाल मीना यांना उमेदवारी देण्यात आली आहे.