हरियाणामध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. दरम्यान, आज खासदार राहुल गांधी यांनी एका सभेत भाजपावर निशाणा साधला. 'भाजपच्या राजवटीत गरिबांच्या खिशातून पैसे काढले जात आहेत. हरियाणात अदानी आणि अंबानी सरकारची गरज नाही, येथे गरीब आणि मजुरांचे सरकार हवे आहे,असंही राहुल गांधी म्हणाले.
याआधी प्रियंका गांधी यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आणि गेल्या १० वर्षांत हरियाणाला काय मिळाले, असा सवाल केला. तुम्हाला बेरोजगारी मिळाली, तुम्हाला अग्निवीर मिळाला. हरियाणाने देशाची इज्जत जपली. मात्र येथील तरुण बेरोजगारीने त्रस्त आहेत.
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
राहुल गांधी म्हणाले की, भाजपच्या राजवटीत गरिबांच्या खिशातून पैसे काढले जात आहेत. जनतेच्या खिशातून पैसा निघत आहे. तर धनदांडग्यांच्या खात्यात पैसे येत आहेत. त्सुनामीप्रमाणे अदानीच्या खात्यात पैसे येत आहेत पण तुमचे खाते रिकामे होत आहेत.
राहुल गांधी म्हणाले, “येथे प्रत्येक भाषणात आदर हा शब्द वापरला गेला. प्रत्येकासाठी आदर महत्त्वाचा आहे. लोकांच्या खिशात किती पैसे येत आहेत आणि किती पैसे काढले जात आहेत हेही महत्त्वाचे आहे. पंतप्रधान मोदी तुमचा आदर करतात, पण दिवसभर तुमच्या खिशातून पैसे काढत असतात, हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे, असा आरोपही गांधी यांनी केला.
राहुल गांधी म्हणाले की, “येथे कोणत्या जातीचे लोक राहतात हे शोधायचे आहे. दिल्लीतील ९० अधिकारी जे संपूर्ण देश चालवतात, त्यापैकी फक्त ३ ओबीसी श्रेणीतील आहेत, जे त्यांच्या एकूण लोकसंख्येच्या ५० टक्के आहेत. दलित १५ टक्के आहेत. १०० रुपयांमध्ये १ रुपयाचा निर्णय दलित अधिकारी घेतात. म्हणूनच मी म्हटले आहे की, देशात किती ओबीसी आहेत हे जाणून घ्यायचे आहे. त्यात दलित किती आणि आदिवासी किती?, असंही राहुल गांधी म्हणाले.
आपल्या भाषणाच्या शेवटी राहुल गांधींनी हरियाणात निवडणूक लढणाऱ्या छोट्या पक्षांवर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले, येथे निवडणूक लढवणारे छोटे आणि स्वतंत्र पक्ष आहेत. हे सर्व भारतीय जनता पक्षाचे पक्ष आहेत. त्यांचा रिमोट कंट्रोल भाजपकडे आहे. येथे खरी लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे. इथे विचारधारांची लढाई आहे. एका बाजूला न्याय आणि अन्याय दुसऱ्या बाजूला. एकीकडे शेतकरी-मजुरांचे हित आहे तर दुसरीकडे अदानी, अंबानींसारख्या लोकांचा फायदा आहे, असंही राहुल गांधी म्हणाले.