नवी दिल्ली - नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात गेल्या शुक्रवारी लोकसभेत मांडल्या गेलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली गळाभेट हीच सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली. मात्र या गळाभेटीवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, राहुल गांधींच्या या गळाभेटीला भाजपाने कवितेच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केले. मात्र भाषण संपल्यानंतर त्यांनी नरेंद्र मोदींची घेतलेला गळाभेट आणि नंतर आपल्या शेजारी बसलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांना मारलेला डोळा यामुळे भाजपा नेत्यांना त्यांच्याविरोधात आयतेच कोलीत मिळाले. तेव्हापासून भाजपाच्या मंत्र्यांपासून नेत्यांपर्यंत सर्वांनी राहुल गांधींना टीकेचे लक्ष्य करणे सुरू ठेवले आहे. दरम्यान, सोमवारी भारतीय जनता पक्षाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक कविता शेअर केली आहे. "70 साल प्यार का नाटक, बंद करो झूट का फाटक या आशयाच्या या कवितेमधून राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.
No Confidence Motion : 'बन्द करो ये झूठ का फाटक...'; राहुल गांधींच्या 'झप्पी'ला भाजपाचं कवितेतून प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 3:49 PM