शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

भाजपा सर्वात श्रीमंत, काँग्रेस मात्र घाट्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 4:37 AM

देशातील सात प्रमुख राजकीय पक्षांमध्ये भारतीय जनता पार्टी हा सर्वात श्रीमंत पक्ष असल्याचे या पक्षांनी दाखल केलेल्या वर्ष २०१६-१७च्या प्राप्तिकर विवरणपत्रांवरून दिसून येते.

नवी दिल्ली : देशातील सात प्रमुख राजकीय पक्षांमध्ये भारतीय जनता पार्टी हा सर्वात श्रीमंत पक्ष असल्याचे या पक्षांनी दाखल केलेल्या वर्ष २०१६-१७च्या प्राप्तिकर विवरणपत्रांवरून दिसून येते. उत्पन्नाच्या दृष्टीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा भाजपाच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत असला तरी उत्पन्नाहून खर्च अधिक असल्याने हा पक्ष घाट्यात असल्याचेही स्पष्ट होते.या राजकीय पक्षांच्या प्राप्तिकर विवरणपत्रांचे विश्लेषण करून ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म््स’ (एडीआर) या स्वयंसेवी संस्थेने एक तौलनिक अहवाल मंगळवारी प्रसिद्ध केला. त्यानुसार गेल्या वर्षी भाजपाने १,०३४.२७ कोटी रुपयांचे उत्पन्न जाहीर केले. सर्व पक्षांच्या एकत्रित उत्पन्नाचा विचार केला तर त्यातील एकट्या भाजपाचा वाटा ६६.३४ टक्के आहे.काँग्रेसला गेल्या वर्षी एकूण २२५.३६ कोटींचे उत्पन्न मिळाले तर या पक्षाने ३२१ कोटी रुपयांचा खर्च केला. याउलट बहुजन समाज पक्षाचे (बसपा) ७० टक्के, भाजपाचे ३१ टक्के तर भारतीय कम्युन्स्टि पक्षाचे सहा टक्के उत्पन्न वर्षअखेर खर्च न होता शिल्लक राहिले, असेही या अहवालात नमूद करण्यात आले.गेल्या वर्षी या सात राजकीय पक्षांनी मिळून १,५५९.१७ कोटी रुपयांचे उत्पन्न व एकूण १,२२८ कोटी रुपयांचा खर्च जाहीर केला. या पक्षांच्या उत्पन्नात ऐच्छिक देणग्यांचा वाटा सर्वात जास्त म्हणजे ७४ टक्के (१,१६९ कोटी रु.) होता. त्याखालोखाल बँकांमधील ठेवींवरील व्याज (१२८ कोटी रु.) व कूपन विक्री (१२४ कोटी रु.) यातून या पक्षांना प्रमुख उत्पन्न मिळाले.या अहवालातून समोर आलेली आणखी एक लक्षणीय बाब म्हणजे आधीच्या वर्षाच्या तुलनेत गेल्या वर्षी भाजपाचे उत्पन्न ४६४ कोटी रुपयांनी (८१ टक्के), बसपाचे उत्पन्न २१६ कोटी रुपयांनी (२६६ टक्के) तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्पन्न सुमारे नऊ कोटी रुपयांनी (८८ टक्के) वाढले. काँग्रेसचे उत्पन्न मात्र ३६ कोटी रुपयांनी (१४ टक्के) घटले. अशीच घट तृणमूल काँग्रेस (८१ टक्के) व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (६ टक्के) उत्पन्नातही दिसून आली.राजकीय पक्षांनी त्यांचा लेखा परीक्षण केलेला ताळेबंद निवडणूक आयोगाकडे सादर करण्याची अखेरची मुदत ३० आॅक्टोबर २०१७ ही होती. भाजपाने ९९ दिवस तर काँग्रेसने १३८ दिवस विलंबाने हिशेब सादर केले. सात प्रमुख पक्षांपैकी भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष हे चार पक्ष गेली सलग पाच वर्षे विलंबाने हिशेब सादर करत आल्याचेही या अहवालात म्हटले आहे.>जमा-खर्चाच्या प्रमुख बाबीभाजपाला सर्वाधिक ९९७ कोटी रुपयांचे उत्पन्न (९६ टक्के) ऐच्छिक देणग्यांमधून मिळाले. पक्षाने यापैकी सर्वाधिक ६०६ कोटी रुपये प्रचारावर खर्च केले तर प्रशासकीय कामांवर ६९.७८ कोटी रुपयांचा कर्च केला.कूपन विक्रीतून मिळालेले ११५ कोटी रुपये हे काँग्रेसचे उत्पन्नाचे सर्वात प्रमुख (५१ टक्के) साधन होते. पक्षाने निवडणूक प्रचारावर १४९ कोटी रुपये व प्रशासकीय व्यवस्थेवर ११५ कोटी रुपये खर्च केले>भारतीय जनता पार्टीएकूण उत्पन्न-१,०३४.२७ कोटी रु.एकूण खर्च- ७१० कोटी रु.शिल्लक- ४६४ कोटी रु.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसएकूण उत्पन्न- २६१.५६ कोटी रु.एकूण खर्च- ३२१.६६ कोटी रु.घाटा- ९६ कोटी रु.