PFI Planning Busted: केंद्रीय तपास संस्थेने (NIA) अलीकडेच देशभर ठापे टाकून PFI चे कंबरडे मोडले. या छाप्यादरम्यान 100 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली. आता महाराष्ट्र एटीएसच्या सूत्रांच्या हवाल्याने एक मोठी बातमी समोर येत आहे. पीएफआयच्या रडारवर RSS आणि भाजपचे अनेक बडे नेते होते. विशेष म्हणजे, नागपूर येथील आरएसएसचे मुख्यालयही पीएफआयच्या निशाण्यावर होते.
RSSमुख्यालय निशाण्यावरगेल्या आठवड्यातच, केंद्रीय तपास संस्था, CRPF आणि राज्य ATS ने देशभरातील 10 राज्यांमध्ये PFI शी संबंधित लोकांवर छापे टाकले आणि शेकडो लोकांना अटक केली. चौकशीदरम्यान, तपास यंत्रणेला मोठी माहिती मिळाली. पीएफआय देशातील आरएसएस आणि भाजपच्या बड्या नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचत होता, अशी माहिती मिळत आहे. यासाठी पीएफआयच्या सदस्यांनी दसऱ्याच्या दिवशी होणाऱ्या आरएसएसच्या पथसंचलनाची माहितीही गोळा केली होती.
यूपीमध्ये धर्मांतरासाठी पैसेदुसरीकडे, उत्तर प्रदेशात सुरक्षा यंत्रणांनी उघड केले की, पीएफआय राज्यात आपले पाय रोवत आहे. सदस्यसंख्या वाढवण्यासाठी विशेष योजनाही सुरू केली आहे. एजन्सींच्या म्हणण्यानुसार, पीएफआय लोकांना पैशाच्या जोरावर हिंदू मुलींना धर्मांतरित करण्यासाठी खुल्या ऑफर देते. याशिवाय धर्मांतर करणाऱ्यांना रोजगार, पैसा आणि घर दिले जाते. यासोबतच एखादे दुकान उघडण्यासाठीही व्यवस्था करण्यात येते.
लखनौ-बाराबंकी सीमेवर प्रशिक्षण केंद्र
सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएफआय सदस्यांनी लखनौ-बाराबंकी सीमेवरील काकोरी, कुर्सी गावात प्रशिक्षण शिबिर उभारले होते. तिथे लोकांना लव्ह-जिहाद, धर्मांतर कसे करावे याबद्दल माहिती देण्यात आली. नुकताच लखनौमध्ये अटक झालेला उमर गौतम धर्मांतर करायचा. तो SDPI चा सक्रिय सदस्य आणि हाल-हराम अकादमीचा उपाध्यक्षही होता, अशी माहिती समोर आली आहे.