हरीश गुप्ता
नवी दिल्ली : भाजपची सत्ता असलेल्या अनेक राज्यांनी खासगी कोविड-१९ तपासणी प्रयोगशाळा या प्रमाणित नमुन्यांचे (नॉर्म्स) उल्लंघन करीत असल्याची तक्रार भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडे (आयसीएमआर) केली आहे. कोविड-१९ साठीच्या चाचण्या आणि याबाबतच्या ७७१ प्रयोगशाळांवर नियंत्रण ठेवणाऱ्या आयसीएमआरने या तक्रारींनुसार चौकशी सुरू केली आहे.
खासगी क्षेत्रातील अनेक प्रयोगशाळा या प्रमाणित नमुन्यांचे पालन करीत नसल्याचे आरोप आहेत. वरिष्ठ अधिकाºयाने म्हटले की, राज्यांनी ज्या खासगी प्रयोगशाळांबद्दल तक्रार केली आहे त्यांना दिल्या गेलेल्या परवान्याचा आढावा घेण्याची तयारी आयसीएमआरने सुरू केली आहे. भाजपची सत्ता असलेल्या राज्यांनी (बिहार, उत्तर प्रदेश, हरयाणा) खासगी प्रयोगशाळांनी केलेल्या धडधडीत चुकांचा तसेच माहिती दडवून ठेवल्याचा उल्लेख तक्रारीत केला असल्याचे समजते. आयसीएमआरच्या अधिकाºयाने सांगितले की, जर एखाद्या राज्याने अशा खासगी प्रयोगशाळांना दिलेल्या मान्यतेच्या प्रक्रियेचा आढावा घेण्याची इच्छा व्यक्त केल्यास अशा चुका करणाºया प्रयोगशाळा कोविड-१९ विषाणूची चाचणी करण्याचा परवाना गमावू शकतील.महाराष्ट्रात आठ जूनपर्यंत ८९ प्रयोगशाळा असून तेथे ५.३८ लाख तर तामिळनाडूत ७७ प्रयोगशाळांमध्ये ५.७६ लाख चाचण्या झाल्या आहेत. बिहार हे लोकसंख्येत देशात दुसºया क्रमांकाचे राज्य असून तेथे २७ प्रयोगशाळा असून पाटणा आणि सासाराम येथे दोन खासगी प्रयोगशाळा आहेत. बिहारमध्ये देशात ८ जूनच्या सकाळपर्यंत सगळ्यात कमी फक्त ९५ हजार चाचण्या केल्या गेल्या आहेत. याचा अर्थ दर दहा लाख लोकसंख्येमागे फक्त ७८७ चाचण्या. देशाचा सरासरी दर दहा लाख लोकसंख्येमागे ३३८१ आहे. बिहारची काळजी ही आहे की, त्यांचे चाचण्यांचे प्रमाण खूप कमी असूनही रुग्ण पॉझिटिव्ह निघण्याचे प्रमाण पाच टक्के आहे. जर जास्त चाचण्या झाल्या तर त्यांचा निष्कर्ष हा आणखी काळजी करायला लावणारा असू शकतो.काय आहेत नेमक्या तक्रारी?एक समान तक्रार म्हणजे खासगी प्रयोगशाळांमध्ये जे नमुने पॉझिटिव्ह निघाले ते सरकारी प्रयोगशाळांमध्ये निगेटिव्ह आले. हरयाणादेखील काही वेगळा नाही. कारण तेथेही गेल्या आठवड्यात रुग्ण रोजच्या रोज वाढले आहेत.राज्यात खासगी ८ प्रयोगशाळांसह एकूण २० असून त्या सगळ्या गुरुग्राममध्येच आहेत. हरयाणात अनेक खासगी प्रयोगशाळांना राज्य सरकारने चाचण्या झालेल्या नमुन्यांची अधिकृत माहिती राज्याच्या यंत्रणांना न दिल्याबद्दल नोटीस दिली आहे.