नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन यांच्यात एलएसी सीमेवर तणाव वाढला आहे. कमांडर स्तरापासून मुत्सद्दी पातळीपर्यंत दोन्ही देशांमधील वाद मिटविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
दरम्यान, सीमेवर निर्माण झालेल्या तणावाबाबत एका वृत्तवाहिनीवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भाजपा नेते संबित पात्रा सहभागी झाले होते. मात्र, यावेळी संबित पात्रा यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत एक वादग्रस्त विधान केले. या विधानावरून सोशल मीडियावर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे.
हिंदी वृत्तवाहिनीवर एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसकडून पक्षाचे प्रवक्ते पवन खेडा सहभागी झाले होते. तर भाजपाकडून चर्चासत्रात संबित पात्रा हे सहभागी झाले होते. चर्चेदरम्यान, खेडा यांनी संबित पात्रा यांना घेरण्याचा प्रयत्न केला. जर मोदी सरकारने योग्य रणनिती आखली असती तर गलवानमध्ये जी घटना घडली, ती घडली नसती, असे पवन खेडा म्हणाले.
याला प्रत्युत्तर देताना संबित पात्रा म्हणाले, "जर पंडित नेहरू नसते तर आज चीनचा प्रश्नच निर्माण झाला नसता. हे सर्व त्यांच्यामुळे होत आहे. त्यावेळी ते आपला वाढदिवस साजरा करत होते. येत्या दोन चार दिवसांत पत्रकार परिषद घेऊन सर्वकाही समोर आणू."
दरम्यान, संबित पात्रा यांनी स्वत: या चर्चासत्रातील ही क्लिप आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे. त्यावरही पवन खेडा यांनी ट्विटच्या माध्यमातून त्यांना प्रत्युत्तर दिले. "जर नेहरू नसते तर आज तुम्ही सर संबित पात्रा असता आणि नरेंद्र मोदी हे राय बहादुर नरेंद्र मोदी असते. आजही इंग्रजांच्या गुलामगिरीच्या रंगात रंगला असता,"असे पवन खेडा यांनी म्हटले आहे.
आणखी बातम्या...
अमेरिकेत शीख व्यक्तीच्या रेस्टॉरंटची तोडफोड, लिहिले Hate Messages...
भारताचे मंत्रालय आणि कंपन्या चिनी हॅकर्सच्या निशाण्यावर - रिपोर्ट
46 वर्षांनंतर पहिल्यांदाच PPF वरील व्याजदर होऊ शकतो 7 टक्क्यांपेक्षा कमी!
'मेड इन चायना' नको तर मग 'या' ब्रँडचे खरेदी करू शकता स्मार्टफोन