नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमधून देशवासीयांशी संवाद साधला. लोकलसाठी व्होकल व्हा, याचा पुनरुच्चार मोदींनी केला. खेळण्यांच्या निर्मितीत देशाला अग्रेसर होण्याची संधी आहे. त्यामुळे यासाठी स्टार्टअप्स कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहनही मोदींनी केलं. मात्र मोदींची 'मन की बात' अनेकांना पटलेली दिसत नाही. भाजपच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरील आकडेवारीतून ही बाब अधोरेखित झाली आहे. 'मन की बात' चा व्हिडीओ लाईक करणाऱ्यांच्या तुलनेत डिसलाईक करणाऱ्यांची संख्या ही कित्येक पटीने अधिक आहे.
'मन की बात'च्या व्हिडीओवरील 'डिस्लाईक' मागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. भाजपाचे आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विटरवरून याबाबतचे ट्विट केले आहे. व्हिडीओ डिसलाईक करणाऱ्यांमध्ये 98 टक्के विदेशीतील नागरिक आहेत आणि यामागे काँग्रेसचा हात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. "गेल्या 24 तासांत युट्यूबवर 'मन की बात' व्हिडिओला डिसलाईक करण्याचा संघटीत प्रयत्न झाला. काँग्रेसचा आत्मविश्वास इतका कमी आहे की त्यांनी विजय झाल्यासारखं ते साजरा करत आहेत. पण डिसलाईकपैकी फक्त 2 टक्के नागरिक हे भारतातील आहेत. हे यूट्यूबच्या डेटावरून दिसून येतंय" असं अमित यांनी म्हटलं आहे.
"नेहमीप्रमाणे उर्वरित 98 टक्के हे भारताबाहेरील आहेत. विदेशातील बॉट्स आणि ट्विटर अकाउंटस काँग्रेसच्या जेईई-नेटविरोधी मोहिमेचा कायमचा भाग राहिले आहेत. राहुल गांधींच्या तुर्कीतील बॉट्सची सक्रियता खूप वाढली आहे. राहुल गांधींना तुर्कीचा एवढा पुळका का आहे?', प्रादेशिक आणि इतर विभागांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काँग्रेस अनेक हँडल्सनी 'मन की बात'चा व्हिडीओ 'डिसलाईक' करण्यासाठी मोहीम राबवली होती" असं देखील अमित मालवीय यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'मधून त्यांचे विचार मांडले. भाजपाने त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनवरून 'मन की बात'चा व्हिडीओ शेअर केला. मोदींच्या 'मन की बात'वर अक्षरश: डिसलाईक्सचा पाऊस पडला आहे. कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी मोदींच्या 'मन की बात'बद्दल स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. या व्हिडीओवर हजारो कमेंट्स आल्या आहेत. यातल्या बहुतांश कमेंट्स नकारात्मक आहेत. आमच्या आयुष्याशी खेळत आहात, ते कमी आहे का की आता यांना आणखी खेळणी हवी आहेत?, मोदींना निवडून दिलं हीच आमची चूक आहे अशा कमेंट्स मन की बातच्या खाली आल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
बापरे! अचानक गेली वीज, तब्बल 20 तास ट्रेनमध्ये अडकले हजारो प्रवासी
भयंकर! लपाछपी खेळण्याच्या बहाण्याने 7 मुलांनी केला 8 वर्षीय मुलीवर बलात्कार
ऐकावं ते नवलच! पतीच्या पासपोर्टवर 'ती' बॉयफ्रेंडला घेऊन गेली ऑस्ट्रेलियाला अन्...