नवी दिल्ली : पाच वर्षानंतर भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकारचे काम जनतेपुढे असेल, असे सांगत भाजपाने मंगळवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’चा नारा दिला़ याउलट काँग्रेसने मात्र भाजपाच्या या ना:यातील हवा काढत रालोआ सरकारच्या अजेंडय़ात कुठलाही नवा विचार, नवा कार्यक्रम व नवी योजना नसल्याचे म्हटल़े
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर मंगळवारी लोकसभा व राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांत चर्चा झाली़ लोकसभेत भाजपाचे राजीव प्रताप रुडी आणि राज्यसभेत त्याच पक्षाचे मुख्तार अब्बास नकवी यांनी चर्चेची सुरुवात केली़ देशाची प्रतिष्ठा, स्वाभिमान आणि सुरक्षा यावर कुठलीही आच येऊ न देता विकास केला जाईल आणि या विकासात कुठलाही भेदभाव केला जाणार नाही, असे भाजपाने म्हटल़े ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ असा नारा भाजपाने दिला़