ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - भाजपाने राम मंदिरावर बोलणे बंद करावे असे खडे बोल सुनावत आता कोणत्याही राजकीय पक्षाच्या मदतीशिवाय राममंदिर बांधू असा निर्धार शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत बहुमत नसल्याचे कारण देत राम मंदिरासंदर्भात कायदा करणे अशक्य असल्याचे काही दिवासंपूर्वी म्हटले होते. यापार्श्वभूमीवर शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी भाजपाला फटकारले. भाजपा नेत्यांना आमची हात जोडून कळकळीची विनंती आहे की आता तुम्ही राम मंदिरासंदर्भात बोलणे बंद करावे असे शंकराचार्य यांनी म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने आमच्या बाजून निर्णय दिला तर आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या मदतीशिवाय राम मंदिर बांधून दाखवू असेही शंकराचार्यांनी म्हटले आहे.