नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचं एक ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी समारंभादरम्यान स्मृती इराणी यांनी एक फोटो काढला होता. या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, जे. पी. नड्डा ही सर्व दिग्गज मंडळी एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळत आहेत. स्मृती यांनी काढलेल्या फोटोचं क्रेडीट हे दुसऱ्यांनाच देण्यात आलं आहे. यावर आता केंद्रीय मंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
स्मृती इराणी (BJP Smriti Irani) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून 25 मार्च रोजी एक फोटो शेअर केला होता. या फोटोला त्यांनी मेरा परिवार, भाजपा परिवार असं कॅप्शन देखील दिलं होतं. या फोटोमध्ये नरेंद्र मोदींसह अनेक मोठी मंडळी पाहायला मिळाली. मात्र आता स्मृती इराणी यांनी काढलेल्या या खास फोटोचं क्रेडीट हे ANI या वृत्तसंस्थेला देण्यात आलं आहे. त्यावर स्मृती यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
"फोटो मी काढला आणि क्रेडिट ANI ला देण्यात आलं" असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा एक ट्विट केलं आहे. यासोबतच त्यांनी नाराज झाल्याचं दर्शवणारा एक इमोजी देखील वापरला आहे. स्मृती इराणी यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेलं पाहायला मिळत आहे.
ANI च्या एडीटर स्मिता प्रकाश यांनी स्मृती इराणी यांच्या ट्विटला रिप्लाय दिला आहे. "बड़े-बड़े शहरों में ऐसी छोटी-छोटी बातें हो जाती हैं सेनोरिटा" असं म्हणत हार्ट शेपचा इमोजी शेअर केला आहे. युजर्सनी देखील यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.