शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

दक्षिण भारतात भाजपला मर्यादाच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 4:31 AM

दक्षिण भारतातील पाच राज्यांत आणि तीन केंद्रशासित प्रदेशांतील १३२ मतदारसंघांमध्ये भाजपला केवळ तीस जागा मिळाल्या आहेत;

- वसंत भोसलेदेशाच्या अनेक राज्यांत मोदी लाट आली असताना दक्षिण भारतातील पाच राज्यांत आणि तीन केंद्रशासित प्रदेशांतील १३२ मतदारसंघांमध्ये भाजपला केवळ तीस जागा मिळाल्या आहेत; शिवाय मित्रपक्षांचाही दारुण पराभव झाला आहे. कर्नाटक या एकमेव राज्यानेच मोदी लाटेत उडी घेतली आहे. याउलट प्रादेशिक पक्षांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व दाखवून दिले आहे.तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांत अनेक वर्षांपासून प्रादेशिक पक्षांचा दबदबा आहे. तमिळनाडूत तर ५२ वर्षांपूर्वी राष्ट्रीय पक्षाचा पराभव झाला आहे तेव्हापासून द्रविड मुनेन कळघम किंवा अण्णा द्रमुक या पक्षांची सत्ता येते. लोकसभेच्या निवडणुकीत याच पक्षांना यश मिळते. या पक्षांबरोबर राष्ट्रीय पक्षांना जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. दक्षिण भारतातील पाच राज्यांत आणि तीन केंद्रशासित प्रदेशांत १३२ लोकसभेचे मतदारसंघ आहेत. सन २०१४ च्या निवडणुकीत प्रादेशिक पक्ष आणि अन्य स्थानिक पक्षांना यापैकी ९० जागा मिळाल्या होत्या. भाजप आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांना अनुक्रमे २२ आणि २० जागा मिळाल्या होत्या.तमिळनाडूमध्ये सत्तारूढ अण्णा द्रमुक-भाजप या युतीला केवळ एकच जागा मिळाली. द्रमुक पक्षाने काँग्रेस, मार्क्सवादी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष तसेच पीएमके, आदी पक्षांबरोबर महागठबंधन केले होते. या महागठबंधनने ३८ पैकी ३७ जागा जिंकल्या. त्यामध्ये द्रमुकला २२, काँग्रेस आठ, तर डाव्या पक्षांना चार जागा मिळाल्या आहेत.कर्नाटकात भाजपने मुसंडी मारत आपलाच पक्ष प्रथम क्रमांकावर आहे, हे सिद्ध केले आहे. राज्यात गतवर्षी सत्तेवर आलेल्या काँग्रेस जनता दल आघाडीचा सपशेल पराभव झाला आहे. भाजपने २५ जागा जिंकल्या, तर काँग्रेस आणि जनता दलास प्रत्येकी एकच जागा मिळाली आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, माजी मुख्यमंत्री वीराप्पा मोईली, ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे, आदींचा पराभव झाला आहे. भाजपने ही निवडणूक एकतर्फीच जिंकली आहे. एका जागेवर (मंड्या) अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. त्यालाही भाजपचा पाठिंबा होता.

आंध्र प्रदेशात भाजपचा करिष्मा चालला नाही. काँग्रेसही स्पर्धेत राहिली नाही. या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना २५ पैकी एकही जागा मिळाली नाही. याउलट सत्तारूढ तेलगू देसम या पक्षाला पर्यायी वायएसआर काँग्रेस या नव्या प्रादेशिक पक्षाचा उदय झाला आहे. तो प्रथम राज्यातही सत्तारूढ होतो आहे. लोकसभेच्या २२ जागा जिंकणाऱ्या वायएसआर काँग्रेसच्या जगनमोहन रेड्डी यांच्याकडे विधानसभेत बहुमत दिले आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या राजकारणाला वेसण घातली गेली आहे.>काही महिन्यांपूर्वी तेलंगणा विधानसभेची निवडणूक एकतर्फी जिंकणारा तेलंगणा राष्ट्रीय समितीस थोडा धक्का देण्यात विरोधकांना यश आले आहे. समितीला १७ पैकी ९ जागा मिळाल्या आहेत. मात्र, मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कन्येचा पराभव झाला आहे. भाजपने एका जागेवरून उडी मारत चार जागा पटकाविल्या आहेत. काँग्रेसला तीन आणि एमआयएमला एक जागा मिळाली आहे. लक्षद्वीप, पुडुचेरी व अंदमान-निकोबार या केंद्रशासित प्रदेशांत प्रत्येकी एक जागा काँग्रेसने जिंकली आहे.
>केरळमध्ये सत्तारूढ डाव्या आघाडीला काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीने जोरदार धक्का दिला. २० पैकी १९ जागा या आघाडीने जिंकल्या. त्यात काँग्रेसच्या पंधरा जागांचा समावेश आहे. पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी वायनाड मतदारसंघातून जिंकले. डाव्या आघाडीला तीनच जागा मिळाल्या.>दक्षिण भारतातील पक्षीय बलाबल२०१४राज्य जागा भाजप काँग्रेस प्रादेशिक अन्यतेलंगणा १७ १ २ ११ (टीआरएस) ३आंध्रप्रदेश २५ २ - १५ (तेदे) ८ (वायएस) -तमिळनाडू ३९ १ - ३७ (अण्णा द्रमुक)केरळ २० - ९ ६ (डावे) ५कर्नाटक २८ १७ ९ २ (जद) -लक्षद्वीप १ - - १ (राष्ट्रवादी) -अंदमान १ १ - - -पुडुचेरी १ - - १ १एकूण १३२ २२ २० ७२ १८>२०१९राज्य भाजप काँग्रेस प्रादेशिक अन्यतेलंगणा ४ ३ ९ (टीआरएस) १आंध्रप्रदेश - - ३ (तेदे) २२ (वायएस)तमिळनाडू - ८ २२ (द्रमुक) ८केरळ - १५ ३ डावे २कर्नाटक २६ १ १ (जद) -लक्षद्वीप - १ - -अंदमान - १ - -पुडुचेरी - १ - -एकूण ३० ३० ३८ ३३

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९