नवी दिल्ली - दलितांना भजपमध्ये काहीही किंमत नाही. राष्ट्रपती कोविंद योगींसमोर उभे राहतात आणि मोदी कोविंद यांचा नमस्कारही घेत नाहीत, असे म्हणज काँग्रेस नेते उदित राज यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ते एबीपी न्यूजवरील एका डिबेटमध्ये बोलत होते. (BJP Spokesperson Prem shukla debate with congress leader Udit Raj on Hindi news channel)
काँग्रेस नेते उदित राज म्हणाले, भाजप प्रवक्ते म्हणतात, की माझी भाजपत राहण्याची लायकी नव्हती. भाजपत राहण्याची दलितांची काहीच लायकी नाही. यावर भाजप प्रवक्ते टोकत म्हणाले, की देशाचे राष्ट्रपती दलितच आहेत. यावर माजी खासदार उदित राज म्हणाले, राष्ट्रपती कोविंद योगीजींसमोर उभे राहतात आणि मोदीजी कोविंद यांचा नमस्कारही घेत नाहीत. भाजपने तुम्हाला खासदार केलं, काँग्रेसनं काय दिलं? -उदित राज म्हणाले, भाजपमध्ये दलितांना काही किंमत नाही, हे सांगून आपण फारच चांगले केले. यावर पलटवार करत भाजप प्रवक्ते प्रेम शुक्ला म्हणाले, काँग्रेसमध्ये दलितांना काहीही किंमत नाही. प्रेम शुक्ला म्हणाले, उदित राज यांना भाजपने दिल्लीतून खासदार बनवले होते. काँग्रेसने काय दिले? एवढेच नाही, तर काँग्रेसमध्ये आपली काय किंमत आहे? असा सवालही प्रेम शुक्ला यांनी उदित राज यांना केला.
यावर उदित राज म्हणाले, ‘मी भाजप प्रवक्त्याचे आभार मानतो, की त्यांनी भाजप आणि आरएसएस कसा विचार करते? हे सांगितले,' एवढेच नाही, तर भाजपने आपल्याला आपल्या दारात येऊन तिकीट दिले आणि आपली व्होट बँक लुटली, असा आरोपही उदित राज यांनी यावेळी केला.