नवी दिल्ली -काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या देशात नहीत, असा दावा भाजपाने केला आहे. भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, राहुल गांधी सध्या परदेशात आहेत. ट्विटरवर जारी केल्या जात असलेल्या व्हिडिओंमध्ये ते एकाच पोषाखात दिसत आहेत. विशेष म्हणजे पात्रा यांनी एका राष्ट्रीय न्यूज चॅनलवर हा दावा केला आहे. एवढेच नाही, तर आपण देशात असाल तर मंगळवारी राजस्थान प्रकरणावर एक फ्रेश व्हिडिओ रिलीज करा, असे आव्हानही त्यानी राहुल यांना केले. तसेच वेळ आली की याचा पत्रकार परिषद बोलावून खुलासाही केला जाईल, असेही पात्रा म्हणाले.
पात्रा म्हणाले, 'राहुल गांधी यांच्या संदर्भात एक खुलासा करतो, की व्हिडिओ रिलीज देशात, दिसत आहेत एकाच वेषात, कारण राहुल आहेत परदेशात. हे जे रोजच्या-रोज रिलीज होत आहेत, आपण पाहत आहात, राहुल गांधी एकाच वेषात आहेत. दोन-दोन मिनिटांचा व्हिडिओ कापून तो रिलीज रिलीज केला जात आहे. का? राहुल गांधी रोज का बोलत नाहीत? कारण राहुल गांधी परदेशात आहेत.'
मात्र, यानंतर पात्रा यांनी कदाचीत शब्दाचाही वापर केला. ते म्हणाले, 'राहुल गांधी कदाचित देशात नाहीत. मी विचारतो - आहेत का? आमच्याकडे सर्व बातम्या आहेत. वेळ आली, की पत्रकार परिषदही करू. कदाचित देशात नाहीत, एका तासाचा एक व्हिडिओ तयार करून रोज दोन-दोन मिनिटांचा प्रसिद्ध करतात.'
भाजपा प्रवक्ते संबित पात्रा राहुल गांधी परदेशात नसण्याच्या संभावनेवर म्हणाले, की ते डिफेन्स काउंसिलच्या बैठकीतही सहभागी होत नाहीत, 'डिफेन्स काउंसिलच्या 11 बैठका झाल्या, एका बैठकिलाही गेले नाही. राजस्थान विषयावर एक व्हिडिओ प्रसिद्ध करून एवढं म्हणा, की मी अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांना बसवून समजावतो. हे माझे कर्तव्य आहे. ते नाही करत. फोन करावा लागतोय, पत्र लिहावं लागतंय मोदीजींना. एक दिवस तरी आपण पाहीलं? की गेहलोतजींनी राहुल गांधीजींना पत्र लिहिलं,' असा प्रश्नही पात्रा यांनी यावेळी उपस्थित केला.
महत्त्वाच्या बातम्या -
राजस्थान संकट : सलोख्याचे संकेत?; सचिन पायलटांच्या फेसबुक पोस्टवर पुन्हा दिसला काँग्रेसचा 'हात'
भारताचा चीनवर दुसरा डिजिटल स्ट्राईक; एकाच झटक्यात पुन्हा 47 अॅप्सवर बंदी!
आई शप्पथ, एवढं बील! : भज्जीच्या घराचं वीज बील पाहून व्हाल अवाक; म्हणाला...
भारत-इस्रायलची कमाल!; आता फक्त आवाज अन् श्वासावरून मिळणार कोरोना चाचणीचा अहवाल
100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर