नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पात्रा यांच्या शरीरात कोविड १९ ची लक्षणे दिसल्यानेच त्यांना गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात भरती करण्यात आल्याचे वृत्त अमर उजाला या वेबपोर्टलने दिले आहे. पात्रा हे भाजपा प्रवक्त्यांच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक असून ते सातत्याने न्यूज चॅनेवरील चर्चासत्रात पक्षाची बाजू मांडत असतात.
वृत्तवाहिन्यांमधील चर्चासत्रातून आणि आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सातत्याने भाजपाची बाजू मांडणारे व काँग्रेसविरोधी भूमिका घेणारे संबित पात्रा रुग्णालयात भरती झाले आहेत. पात्रा यांनी एक तासापूर्वीच भाजपा नेते भुपेंद्र यादव यांच्या पत्रकार परिषदेचं ट्विट रिट्विट केलं आहे. तर, आज सकाळपासूनचे ते ट्विटरवर अॅक्टीव्ह दिसत आहेत. स्वातंत्र्यावीर सावरकर यांच्या जयंतीदिनी अभिवादनही आपल्या ट्विटर अकाऊंटरुन त्यांनी केले आहे.
संबित पात्रा यांना रुग्णालयात भरती केले असून त्यांची कोरोना चाचणी घेण्यात येणार असल्याचे समजते. सध्या, ते रुग्णालयात उपचार घेत आहेत.