शहरं
Join us  
Trending Stories
1
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
2
नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, दोघं ताब्यात; मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह चॅट
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मुख्यमंत्री मुंबईतच ठरणार', काँग्रेसच्या हायकमांडला संजय राऊतांचं आव्हान
4
IPL 2025: लिलावात 'या' भारतीय खेळाडूवर लागेल २५-३० कोटींची बोली; Mr. IPL ची भविष्यवाणी
5
धनुष-नयनतारा आमने सामने! ३ सेकंदाच्या व्हिडिओवरुन सुरु आहे वाद; एकाच रांगेत बसले अन्...
6
IND vs AUS : अवघ्या १५० धावांत टीम इंडिया All Out; पदार्पणात Nitish Reddy ची लक्षवेधी खेळी
7
या वीकेंडला OTT वर बघायला मिळेल सिनेमा अन् वेबसीरिजची मेजवानी! वाचा संपूर्ण यादी
8
जगातील सर्वात महाग कॉफी! महिन्याचा पगारही कमी पडेल, विकणारा आहे शेतकरी
9
कोण आहेत सागर अदानी? ज्यांच्यावर लाचखोरीचा झालाय आरोप; मिळालीये मोठी जबाबदारी
10
बंडूकाकांच्या उमेदवारीचा कोणाला लाभ?; मंत्र्यांच्या लढतीकडे जिल्ह्याचे लागले लक्ष
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : योगायोग! उद्या निकाल लागणार, त्याच वेळी पहाटेच्या शपथविधीला पाच वर्ष पूर्ण होणार
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: कुटुंबीय, कार्यकर्त्यांसह उमेदवार रंगले ऐसपैस गप्पांमध्ये
13
Maharashtra Vidhan Sabha Results 2024: मुंबईतील 36 मतदारसंघांची  ‘येथे’ होणार मतमोजणी
14
'या' मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांचं पारडं जड?, सत्तास्थापनेत किंगमेकरही ठरणार?
15
तुमचं Aadhaar कार्ड हरवलंय, आणि नंबरही लक्षात नाहीये; आता काय करावं लागेल? जाणून घ्या 
16
Maharashtra Vidhan Sabha 2024: मुंबईतील २४ मतदारसंघांत महिलांचा 'मत'टक्का पुरुषांपेक्षा जास्त! 
17
छगन भुजबळ आणि माणिकराव शिंदे यांच्यात 'कांटे की टक्कर'; विक्रमी मतांचा फायदा कुणाला होणार?
18
दिंडोरीत पुन्हा घड्याळाची टिकटिक, की वाजणार तुतारी?
19
IND vs AUS : KL राहुलच्या विकेटसह पडली वादाची ठिणगी; खरंच चिटिंग झाली? (VIDEO)
20
Kalbhairav Jayanti 2024: शनिवारी चुकवू नका काल भैरवाची 'ही' उपासना; मिळेल सुख, दूर होईल निराशा!

भाजपने सुरू केली दिल्ली विधानसभा निवडणुकीची तयारी; AAP विरोधात आखली रणनीती...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2024 2:48 PM

फेब्रुवारी 2025 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणूक होणार आहे.

Delhi Assembly Election : एकीकडे महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणूक होणार आहे, तर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून भाजप दिल्लीतील प्रचाराचा शुभारंभ करणार आहे. येत्या आठवडाभरात राज्य निवडणूक व्यवस्थापन समिती, उमेदवार निवड समिती आणि राज्य कोअर ग्रुप तयार करण्यात येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप अनेक आमदारांचा पत्ता कट करण्याच्या तयारीत असून, 10 नगरसेवक आणि माजी नगरसेवकांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

नगरसेवक अन् माजी खासदारांना उमेदवारीदिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप मजबूत पकड आणि चांगली प्रतिमा असलेले नगरसेवक उभे करेल. कालकामधून योगिता सिंग, बाबरपूरमधून मुकेश बन्सल आणि मुंडकामधून गजेंद्र दलाल या तगड्या नगरसेवकांना विधानसभा निवडणुकीत संधी दिली जाऊ शकते. याशिवाय, लोकसभा निवडणुकीत ज्या खासदारांचे तिकीट कापले, त्यांनाही विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली जाऊ शकते.

मित्रपक्षांना जागा मिळणारमाजी खासदार रमेश बिधुरी आणि प्रवेश वर्मा हे विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. दिल्ली विधानसभेत भाजप आपल्या मित्रपक्षांना 3 जागा देऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीएचा मित्रपक्ष जेडीयूला दिल्लीत दोन जागा आणि एलजेपीला (रामविलास) एक जागा दिली जाऊ शकते. दिल्लीतील सीमापुरी, बुरारी आणि संगम विहार विधानसभा जागा JDU आणि LJP सारख्या आघाडीच्या पक्षांना दिल्या जाऊ शकतात.

अनेक आमदारांना डच्चू मिळणारसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील सध्याच्या 7 आमदारांपैकी बहुतांश आमदारांची तिकिटे कापली जाऊ शकतात. भाजपच्या अनेक विद्यमान आमदारांचे सर्वेक्षण अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दिल्लीतील लक्ष्मी नगर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार अभय वर्मा, गांधीनगरमधून अनिल बाजपेयी, विश्वास नगरचे विद्यमान आमदार ओमप्रकाश शर्मा, गोंडा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार अजय महावर यासारख्या विद्यमान आमदारांच्या जागांचे पक्ष सर्वेक्षण करत आहे.

दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ फेब्रुवारी 2025 मध्ये संपणार सध्याच्या दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ 23 फेब्रुवारी 2025 रोजी संपणार आहे. याआधी कधीही निवडणुका होऊ शकतात. दिल्लीत सध्या आम आदमी पक्षाचे सरकार आहे. अलीकडेच अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या. त्या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत. याआधी सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या.

टॅग्स :BJPभाजपाAAPआपdelhiदिल्लीElectionनिवडणूक 2024