नवी दिल्ली: देशात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. कोरोनाबाधित आणि कोरोना मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे. यातच भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी लंडन येथे जी७ देशांच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावत भारताला मदत करणाऱ्या सर्व देशांचे आभार मानले. मात्र, याच कार्यक्रमावरून आता राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. कारण भाजपच्या एका खासदाराने परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना योग्य वागणूक दिली गेली नसल्याचा दावा केला आहे. (bjp subramanian swamy claims external affairs minister s jaishankar dressed like waiter in quarantine)
एस. जयशंकर यांनी जी७ देशांच्या एका कार्यक्रमात सहभागी होत भारतातील कोरोनाची परिस्थिती आणि निवडणुका यांवर सविस्तर भाष्य केले होते. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या परदेश वारीबद्दल भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्विट करत एक दावा केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपूर्वी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि प्रतिनिधी मंडळातील दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यानंतर या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले होते.
एस. जयशंकर यांना वेटरचे कपडे
सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्विट करत यावर भाष्य केले आहे. मला समजले आहे की, भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना लंडनमध्ये क्वारंटाइन करण्यात आले असून, त्यांना वेटरसारखे कपडे देण्यात आले होते, असा दावा करत एस. जयशंकर आता मायदेशात परत येऊ शकत नाहीत. परंतु, ही बाब असत्य असल्यास खंडन करावे, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.
सलाम! ५ महिन्यांच्या बाळावर यशस्वी उपचार; चिमुकल्या जीवासाठी १६ कोटींचे महादान
कोरोनाविरुद्ध लढ्याची जबाबदारी गडकरींकडे द्या
पंतप्रधान कार्यालय हे सध्याच्या कोरोना संकट काळात काहीच कामाचे नसून सध्याची कोरोनाची परिस्थिती हातळण्याची सर्व जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे सहकारी असणाऱ्या नितीन गडकरी यांच्याकडे द्यावी, अशी मागणी सुब्रमण्यम स्वामी यांनी अलीकडेच केली आहे. यासंदर्भात सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट केले होते. त्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते.
क्या बात! ४ वेळा कोरोनावर मात; दोनदा प्लाझ्मादान, कोरोना वॉरियरची कौतुकास्पद कामगिरी
नितीन गडकरीच का?
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन खूपच नम्र असून, त्यांना त्यांच्या खात्याचे काम मोकळेपणाने करू दिले जात नाही; परंतु, अधिकारवाणीने बोलणाऱ्या नेत्यांसारखे ते नसून खूपच नम्र आहेत. गडकरींसोबत काम केल्याने त्यांच्यातील हा गुण नक्कीच बहरेल, नितीन गडकरीच का? असा प्रश्न एकाने विचारला असता स्वामी म्हणाले की, कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी योग्य आरोग्य व्यवस्था उभारणीची गरज लागेल. यामध्ये गडकरींनी यापूर्वीच स्वत:ला सिद्ध करून दाखविले आहे.