नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक देशभरात कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. नवीन कोरोनाबाधितांची संख्या घटताना दिसत असली, तरी कोरोनामुळे होणारे मृत्यू वाढत आहेत. कोरोना संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळत चालल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे चीनच्या कुरघोड्याही अधूनमधून सुरू आहेत. या तिहेरी संकटाशी लढत असताना भाजप खासदाराने केंद्रातील मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. केंद्रातील मोदी सरकार कसलीच जबाबदारी घेत नसल्याची टीका करण्यात आली आहे. (bjp subramanian swamy criticised modi govt over collapsing economy and china intrusion)
भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधताना दिसत आहेत. अनेक मुद्द्यांवरून ते सरकारला घरचा आहेर देत आहेत. आता कोलमडत जात असलेली अर्थव्यवस्था आणि लडाख भागात चीनची सुरू असलेली घुसखोरी यांवरून स्वामी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. याप्रकरणी स्वामी यांनी एक ट्विट केले आहे.
मस्तच! आता Ration Card नसेल तरीही मिळणार मोफत धान्य; सरकारचा दिलासा
मोदी सरकार कसलीच जबाबदारी घेत नाही
सन २०१६ पासून कोलमडत चाललेल्या अर्थव्यवस्थेची जबाबदारी कुणीही घेतलेली नाही. तसेच लडाख भागात चीनकडून होत असलेली घुसखोरी थांबवण्यात अपयश आल्याबाबत कुणीही जबाबदारी घेतली आहे. एवढेच नव्हे तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी उपाययोजना न करण्याबाबत जबाबदारी घेतली, असे सांगत मोदी सरकार कसलीच जबाबदारी घेत नसल्याची टीका सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.
ऐकावं ते नवलच! संकटापासून बचावासाठी थेट कोरोना देवीची स्थापना; धोका कमी होत असल्याचा दावा
भारत एकटा पडण्याच्या स्थितीत
आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या घडामोडी सूरू असून, अमेरिका आणि रशिया यांनी आपापसातील वितुष्ट मिटवले असून, लवकरच याची घोषणा केली जाईल. याला चीननेही समर्थन दिले असून, भारत आता एकटा पडण्याच्या स्थितीत आहे, असा दावा करत हवे असेल, तर आपल्या परराष्ट्रमंत्र्यांना विचारा, असे स्वामी यांनी म्हटले आहे.
Corona Vaccine वर नागरिकांची शंका; ‘या’ देशाने जाळले तब्बल २० हजार डोस!
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात २ लाख ७६ हजार ०७० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर, दिलासादायक बाब म्हणजे याच कालावधीत देशात ३ लाख ६९ हजार ७७ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांत ३,८७४ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.