भाजपा आणि काँग्रेस समर्थकामध्ये लागलेली 1 लाखाची पैज; पैसे जिंकल्यानंतर केलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 04:22 PM2023-12-07T16:22:27+5:302023-12-07T16:27:57+5:30

छिंदवाडा येथील भाजपा समर्थक राम मोहन साहू आणि काँग्रेस समर्थक प्रकाश साहू यांच्यात एक पैज लावण्यात आली होती.

bjp supporter fulfilled election condition of rs 1 lakh in chhindwara donated winning amount to gaushala | भाजपा आणि काँग्रेस समर्थकामध्ये लागलेली 1 लाखाची पैज; पैसे जिंकल्यानंतर केलं असं काही...

फोटो - ndtv.in

मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुका संपल्या आहेत, मात्र निवडणुकीची चर्चा अजूनही सुरू आहे. याचं कारण म्हणजे उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी निवडणुकीच्या उत्साहात केलेली विधानं आहेत. उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी निवडणूक प्रचारादरम्यान पैजही लावली होती. अशीच एक घटना आता समोर आली आहे. ज्याची आता सर्वत्र चर्चा रंगली आहे. 

छिंदवाडा येथील भाजपा समर्थक राम मोहन साहू आणि काँग्रेस समर्थक प्रकाश साहू यांच्यात एक पैज लावण्यात आली होती. दोघेही चांगले मित्र आहेत आणि निवडणुकीच्या निकालाबाबत त्यांच्यामध्ये पैज लागली होती. या दोघांनी काँग्रेसचे उमेदवार कमलनाथ आणि भाजपाचे उमेदवार बंटी साहू यांच्या विजयाची किंवा पराभवाची पैज लावली होती. 

पैजेनुसार, कमलनाथ निवडणूक हरले तर प्रकाश साहू राम मोहन साहू यांना 10 लाख रुपये देतील, पण बंटी साहू निवडणूक हरले तर राम मोहन साहू प्रकाश साहू यांना 1 लाख रुपये देतील. आता निवडणुकीचे निकाल आले आहेत 

पैजेमधून जिंकलेली रक्कम केली दान 

प्रकाश साहू आणि राम मोहन साहू यांच्यात झालेल्या पैजेनुसार राम मोहन साहू हे हरले. त्यानंतर राम मोहन साहू यांनी पैजेची रक्कम म्हणजे एक लाख रुपये प्रकाश साहू यांना दिले. तर प्रकाश साहू यांनी मोठं मन दाखवत जिंकलेली रक्कम चंदन गावातील गोशाळेला दान केली आहे. आता या रकमेतून गोठ्यातील गायींसाठी चाऱ्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: bjp supporter fulfilled election condition of rs 1 lakh in chhindwara donated winning amount to gaushala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.