नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील विजयी कामगिरीमुळे हरयाणातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला २१ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभेत विजय होईल, अशी खात्री वाटत आहे.२०१४ मध्ये हरयाणामध्ये नरेंद्र मोदींच्या लाटेवर स्वार होऊन पहिल्यांदाच भाजपने सरकार स्थापन केले. या पक्षाने हरयाणामधील लोकसभेच्या सर्व १० जागा जिंकल्या. त्यापैकी नऊ विजेत्यांनी १,६०,००० ते ६,५०,००० जादा मते घेत एकूण मतदानापैकी ५८ टक्के मते खेचली. विरोधकांमधील अंतर्गत कुरबुरी आणि परस्पर विरोधाचा आणि जातीय दुफळीचा मोठा फायदा भाजपने बहुमत खेचून घेण्यासाठी घेतला.प्रादेशिक विरोधकांचे प्रभावी अस्तित्वच दिसून आले नाही. मनोहरलाल खट्टर यांना भाजपने मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. त्यामुळे जाट जमातीच्या मुख्यमंत्र्यांचे १८ वर्षे असलेले वर्चस्व संपले. त्यापूर्वी १९९१ मध्ये भजनलाल हेच एकमेव बिगर जाट मुख्यमंत्री होते. १९९६ ते २०१४ पर्यंत बन्सीलाल, ओमप्रकाश चौटाला आणि भूपिंदरसिंग हुड्डा या जाट धर्मियांनीच राज्याचे नेतृत्व केले. एकूण लोकसंख्येत २५ टक्के वाटा असलेले जाट आणि बिगर जाट जाती जमाती यांनी हरियाणाच्या राजकीय वातावरणाची पाशर््वभूमी तयार केली आहे.चंदीगडमधील पंजाब विद्यापीठात राज्यशास्त्र विषय शिकवणारे प्राध्यापक आशुतोष कुमार म्हणाले की, हरियाणामध्ये जाट आणि बिगर जाट यांच्यात स्पष्ट दुफळी आहे. विधानसभा निवडणुकीत हा एक महत्त्वपूर्ण घटक असल्याचे सिद्ध होईल.२०१६ नंतर बिगर जाट समुदायांना एकत्र बांधून ठेवणे ही एक महत्त्वपूर्ण घटना घडली. राखीव जागांच्या आंदोलनांमुळे रोहतक, सोनिपत, झज्जर, जिंद आणि भिवानी या क्षेत्रात जाळपोळ व हिंसाचार झाला. बिगर जाटांचेच यामध्ये मोठे नुकसान झाले. त्यामुळे त्यांच्या मतांचे तीव्र ध्रुवीकरण झाले.
भाजपला हरियाणात विजयाची खात्री
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 2:17 AM